जगभरात सोशल डिस्टेंसिंग आणि सेल्फ आयसोलेशनची चर्चा आहे. अशात कुणालाही हा प्रश्न पडू शकतो की, शारीरिक संबंधाचं काय? म्हणजे काही लोकांना हा प्रश्न पडू शकतो की, कोरोना व्हायरसच्या महामारीचा शारीरिक संबंधावर काय प्रभाव पडणार आहे.
बीबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार, यावर वैज्ञानिकांचं असं मत आहे की, आतापर्यंत असा कोणताही पुरावा मिळाला नाही की, कोरोना व्हायरसमुळे होणारं कोविड-19 चं संक्रमण शारीरिक संबंधाच्या माध्यमातूनही होऊ शकतं. पण आपल्याला हे आधीच माहीत आहे की, श्वास घेण्याची समस्या संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने होऊ शकते. म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने व्हायरसची लागण होऊ शकते.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंगलियामध्ये मेडिसीन विभागाचे एक्सपर्ट प्रोफेसर पॉल हंटर यांनी याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रिटीश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या ताज्या सूचनांचा अर्थ समजावून सांगितला.
प्राध्यापक पॉल हंटर यांनी सांगितले की, 'जर तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरमध्ये कोरोना व्हायरस लक्षणे नसतील तर शारीरिक संबंध टाळण्याचा काही संबंधच येत नाही. पण दर कुणीची तब्येत खराब असेल किंवा दोघांपैकी एकाला काही झालं असेल तर शारीरिक संबंध टाळणे हाच सर्वात चांगला पर्याय ठरेल'.
प्राध्यापक हंटर आणि इतर वैज्ञानिकांचीही यावर सहमती आहे की, लोकांनी त्यांच्या घरात असलेल्या पार्टनर व्यतिरिक्त इतर कुणाशी शारीरिक संबंध ठेवणं किंवा त्यांच्याजवळ जाणं टाळलं पाहिजे.
न्यूयॉर्कच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी लैंगिक जीवनाबाबत नवीन गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्यात स्पष्टपणे सांगितले आहे की, काय सुरक्षित आहे आणि काय सुरक्षित नाही.
त्यांच्या गाइडलाईननुसार, सर्वांनीच दुसऱ्या लोकांसोबत संपर्कात येणं टाळलं पाहिजे. त्यांच्यापासून अंतर ठेवलं पाहिजे. जेणेकरून कोरोना व्हायरसची लागण होणार नाहीय किस केल्याने कोरोनाची लागण लगेच होऊ शकते आणि तो पसरू शकतो. त्यामुळे कुणाला काही झालं असेल किंवा व्हायरसची लक्षणे असतील तर किस टाळावा.