लंडन- कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या भारतासह जगातील अनेक देशांत लॉकडाऊन सुरू आहे. तसेच यादरम्यान, लोकांच्या घराबाहेर पडण्याबाबत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान, घरी असलेले कपल्स पूर्वीपेक्षा अधिक एन्जॉय करत असतील, बेडवर अधिक वेळ घालवत असतील, असा सर्वांचा अंदाज आहे. मात्र असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे मत चुकीचे आहे. अशी माहिती नव्या संशोधनातून समोर आली आहे.
नव्या रिसर्चनुसार कोरोनाच्या या संकटादरम्यान, दहा पैकी सहा जोडप्यांनी सेक्स करणे टाळले आहे. हा रिसर्च द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसीनमध्ये प्रकाशित झाला आहे. यूकेमधील एंग्लिा रस्किन युनिव्हर्सिटीच प्राध्यापक डॉ. ली स्मिथ आणि मार्क टुली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार ब्रिटमध्ये केवळ ४० टक्के जोडप्यांनी आठवड्यातून किमान एकवेळ सेक्स केले. सर्वेत सामील झालेल्या लोकांपैकी ३९.९ टक्के लोकांनी मागच्या काही दिवसांत कुठली ना कुठली सेक्शुअल अॅक्टिव्हिटी केल्याचे सांगितले.
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आलेल्या साथीमुळे निर्माण झालेला तणाव आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश लोक शरीरसंबंध ठेवू शकत नाही आहेत. लॉकडाऊनमुळे कपल्समध्ये शरीरसंबंध अधिक झाले असतील, अशी अपेक्षा होती. मात्र आम्हाला त्या तुलनेच खूपच कमी शरीसंबध ठेवले गेल्याचे दिसून आले, असे डॉक्टर स्मिथ यांनी सांगितले.
कोरोनामुळे लोक चिंतेत आहेत. तसेच मूडही चांगला नसल्याने सेक्सपासून लांबच राहत आहेत. तसेच ज्यांचा विवाह झालेला नाही, असे लोक लॉकडाऊनमुळे आपल्या सेक्शुअल पार्टनला भेटू शकत नाही आहेत, असे हा अभ्यास करणाऱ्या लेखकांचे म्हणणे आहे.