एकीकडे लैंगिक जीवनाबाबत तरूणांमध्ये सक्रियता वाढत आहे. तर दुसरीकडे यासंबंधी आजारांमध्येही वाढ होत आहे. याला जास्तकरून बेजबाबदारपणा हे कारण आहे. लैंगिक आजार आणि गर्भधारणा होण्यापासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणून कंडोमकडे पाहिले जाते. पण तरी सुद्धा लोक याचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, एका आकडेवारीनुसार, तरूणांमध्ये कंडोमचा वापर करण्यात ५२ टक्के कमतरता आढळली आहे.
काय आहे कारण?
thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, तरूणांनुसार कंडोममुळे त्यांना लैंगिक क्रियेत अडसर आल्यासारखं वाटतं. याचा वापर करून लैंगिक संबंध ठेवणे त्यांना सहज वाटत नाही. त्यांना असं वाटतं की, याने ना फीलिंग येत ना ते पूर्णपणे एन्जॉय करू शकत. तरूणांची धारणा असते की, कंडोम वापरण्याचा मुख्य उद्देश हा पार्टनरची गर्भधारणा टाळणे हाच असतो. पण यासाठी तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ते कंडोमचा वापर करण्यावर फार भर देत नाहीत.
जाहिरातींनंतरही जागरूकता कमी
टीव्हीपासून ते वत्तपत्रांपर्यंत, बॅनर्सपासून ते होर्डिंग्सपर्यंत सगळीकडेच कंडोमच्या जाहिराती बघायला मिळतात. तरी सुद्धा याबाबत तरूणांमध्ये जागरूकता कमी बघायला मिळते. सुरूवातीला कंडोम एकप्रकारचेच असायचे, आता तर यात विविधता आली आहे. अचानक झालेल्या शारीरिक संबंधांमध्ये कंडोमबाबत फारच बेजबाबदार वागणूक असते. याबाबत तरूणांचं म्हणणं आहे की, प्रत्येकवेळी ते कंडोम घेऊन फिरू शकत नाहीत. त्यामुळे ते अशा स्थितीत पारंपारिक पद्घतीने काम चालवतात. पण या पद्धतींमुळे गर्भधारणा आणि लैंगिक आजार रोखले जातीलच असे नाही.
अजूनही आहेत पद्धती
कंडोम वापरल्याने पुरूषार्थ कमी होण्याची भावना तर त्यांच्या मनात येत नाही ना? या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं की, त्यांना माहीत आहे की, कंडोम वापरणे हे सुरक्षेसाठी असतं. पण आता सुरक्षेसाठी आणखीही वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ते कंडोम वापरत नाहीत. पण असं अजिबात नाही की, कंडोमचा वापर केल्याने त्यांचा पुरूषार्थ कमी होतो किंवा त्यांच्यात हीनता येते. कंडोमचा वापर न करणे एक ट्रेन्ड झाला आहे. पण याचा वापर केल्यावर असं वाटतं की, आम्ही थोडे घाबरत आहोत.
महिलांमध्ये वाढती जागरूकता
याचं आणखी एक कारण म्हणजे महिलांमध्ये शारीरिक संबंधाप्रति जागरूकता वाढणे हे सुद्धा आहे. त्यांना हे माहीत आहे की, आयपिल घेतल्याने गर्भधारणा टाळता येऊ शकते. त्यामुळे त्या कंडोमचा वापर करणे गरजेचं समजत नाहीत. डॉक्टरांनुसार, गेल्याकाही वर्षांमध्ये प्रीमॅरिटल प्रेग्नेंसीमध्ये फार वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, कंडोमच्या वापरात कमतरता आल्या कारणाने गेल्या ८ वर्षात देशभरात गर्भपात करण्यातही दुप्पट वाढ झाली आहे.
अनेक प्रकरणांमध्ये महिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडेही जात नाहीत. त्या स्वत: काही औषधं खाऊन नको असलेली गर्भधारणा टाळतात. हे फारच घातक ठरू शकतं. आयपिलचा सर्वात मोठा साइड इफेक्ट हा असतो की, ही प्रेग्नेंसी ट्यूबमध्ये अडकून राहते. याने प्रेग्नेंसी ट्यूबचं नुकसान होतं.