(Image Credit : Medical News Today)
ऐकायला भलेही ही बाब विचित्र वाटत असेल, पण ही खरी आहे. निदान एक्सपर्ट्सचं तरी हेच म्हणणं आहे. सामान्यपणे आपण आपला अर्धा वेळ बेडवर घालवतो, मग तो झोपण्यासाठी असो, लेटण्यासाठी असो, टीव्ही-मोबाईल पाहण्यासाठी असो, पण जेव्हा विषय बेडशीट बदलण्याचा येतो तेव्हा अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. किंवा अनकेजण हा विचार करतात की, चला आजच्या दिवस राहू देऊ. उद्या बदलवू, पण उद्या येतच नाही. पण असं करणं फार चुकीचं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, असे फार कमी लोक असतील जे रोज बेडशीट बदलत असतील. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. सर्व्हेच्या माध्यमातून हे समोर आलं की, जास्तीत जास्त लोक कमीत कमी १० ते २० दिवसात त्यांची बेडशीट बदलतात. तर काही लोकांनी सांगितले की, ते शारीरिक संबंधानंतर आवर्जून बेडशीट बदलतात. तेच काही लोकांचं मत आहे की, जेव्हा विषय वन नाइट स्टॅंडचा येतो तेव्हा ते बेडशीट बदलण्यासाठी जराही उशीर करत नाहीत. मात्र पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर बेडशीट बदलणं ते फार महत्त्वाचं समजत नाही.
यावर एक्सपर्ट्स मत जाणून घेण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, शारीरिक संबंध ठेवले नसले तरी सुद्धा सर्वांनी आठवड्यातून कमीत कमी एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे. कारण आपल्या शरीर त्वचेचे सेल्स, दुर्गंधी आणि काही फ्लूइड्स बेडमध्ये सोडतं. अशात जर बेडशीट बदलली नाही आणि रोज त्याच बेडशीटचा वापर केला गेला तर याने लैंगिक संक्रमण म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज(STD) होण्याचा धोका अधिक असतो. यातील एक आहे ट्रायकोमोनिएसिस. हा लैंगिक आजार कोणत्याही महिलेला आणि पुरूषाला सहजपणे होऊ शकतो आणि वेगाने पसरतो. त्यामुळे लैंगिक क्रियेनंतर बेडशीट बदलणे फार गरजेचे आहे.