प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच शीघ्रपतन. एक अशी समस्या आहे जी जास्तीत जास्त पुरूषांना असते. शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मच्या आधीच वीर्य स्खलन होतं. यालाच शीघ्रपतन म्हटलं जातं. शीघ्रपतन समस्या होण्याची वेगवेगळे कारणे एक्सपर्ट्स सांगत असतात. तसेच वेळीच जर यावर उपाय केला गेला नाही तर याचे परिणामही तुमच्या लैंगिक जीवनावर बघायला मिळतात.
तसे तर तुम्ही या समस्येवर उपाय करण्यासाठी एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला संपर्क करू शकता. पण एक ट्रिक आहे जी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनपासून तुम्हाला दिलासा मिळवून देऊ शकते. ही ट्रिक मेनॉपॉज आणि हार्मोनल चेंजेस अफेक्टिंग लिबिडोचे एक्सपर्ट डॉक्टर शहजादी हार्पर यांनी दिली आहे.
डेली स्टार ऑनलाइनसोबत बोलताना डॉक्टर म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीला शीघ्रपतनाची समस्या असेल आणि ऑर्गॅज्मच्या अवस्थेत पोहोचण्याआधीच त्याचं वीर्य स्खलन होत असेल तर त्या व्यक्तीने शारीरिक संबंधावेळी दोन कंडोमचा वापर करावा. जेणेकरून सेंसिटिव्हिटी कमी होईल. जर शारीरिक संबंधादरम्यान परफॉर्मन्सबाबत चिंतेत असाल तर या स्थितीत शारीरिक संबंधाच्या अर्धा तासआधी सिलेक्टिव सेरॉटोनिन रीअपटेक इव्हिबिटर्स घेऊ शकता.
शीघ्रपतन दूर करण्यासाठी आणखी काही उपाय
१) शारीरिक संबंध ठेवल्याने कॅलरी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे मधे मधे ऊर्जा देणारं ग्लूकोज, ज्यूस, दूधाचं सेवन करू शकता. हा उपाय केल्याने शीघ्रपतनाची समस्या दूर होते.
२) शारीरिक संबंधादरम्यान स्खलन तुमच्या इच्छेआधीच होत असेल वेळीच डॉक्टरांना भेटून याबाबत बोला. सामान्यपणे पाहिलं जातं की, लोक याकडे फार लक्ष देत नाही आणि विचार करतात की, ही समस्या आपोआप दूर होईल. असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
३) काही तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधाच्या एक तासआधी हस्तमैथुन केल्याने शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते.
४) शारीरिक संबंधाआधी कमीत कमी १५ मिनिटे फोरप्ले करा. ही शीघ्रपतनावर नियंत्रण मिळवण्याची सर्वात चांगली पद्धत आहे.
५) दिवसातून २ ते ३ वेळा कीगल एक्सरसाइ केल्याने शीघ्रपतनाची समस्या दूर होऊ शकते.
६) शारीरिक संबंधावेळी तुम्हाला वाटेल की, आता स्खलन होणार आहे, तेव्हा क्रिया थांबवून ब्रेक घ्या. असं केल्यानेही शीघ्रपतन होणार नाही.