(Image Credit : TheHealthSite.com)
सामान्यपणे अजूनही हीच भावना लोकांमध्ये बघायला मिळते की, वाढत्या वयासोबत महिलांमध्ये शारीरिक संबंधाचीही इच्छा कमी होत जाते. पण काही प्रकरणांमध्ये असंही बघण्यात आलं आहे की, काही महिलांना मोनोपॉजनंतरही लैंगिक जीवनाचा भरपूर आनंद घेणे सुरू केले. तर अशात हा प्रश्न समोर येतो की, खरंत ४० वय ओलांडल्यानंतर महिलांची शारीरिक संबंधाबाबतची इच्छा कमी होते का? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
कौटुंबिक वाद
अनेकदा परिवार आणि करिअरच्या दृष्टीने तीस ते चाळीस हे वय फार महत्वपूर्ण असतं. या काळात जास्तीत जास्त महिला त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण अनुभवांमधून गेलेल्या असतात. अशात अनेकदा महिला नात्यांमध्ये आलेल्या कडवेपणामुळेही शारीरिक संबंधाप्रति उदासीन होतात.
आधीचे अनुभव
लैंगिक जीवनात तुमचे आतापर्यंतचे अनुभव कसे राहिले, याचाही यावर फार प्रभाव पडतो. याच्या कारणांमध्ये पार्टनरची लैंगिक समस्या, त्याच्याकडून भावनात्मक संतुष्टी न मिळणे, बाळाचा जन्म इत्यादी कारणे असू शकतात. या समस्यांशी एकटीने लढत राहिल्याने अनेकदा महिला शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दुरावा करून घेतात.
प्रतिमेचा प्रभाव
भारतीय समाजात अजूनही शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणाने बोललं जात नाही. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं. शारीरिक संबंधावर मोकळेपणाने बोलणाऱ्या महिलांची एक वेगळीच प्रतिमा तयार केली जाते. ही प्रतिमा तयार होणे आणि बिघडणे याच्या भीतीमुळे अनेक महिला स्वत:वर नियंत्रण ठेवणे सुरू करतात. मग वेगळ्या प्रकारचा तणाव, मित्र-मैत्रिणींचा दबाव आणि सेक्शुअॅलिटीवर मीडियात इमेजमुळे शारीरिक संबंध ठेवण्याप्रति नकारात्मकता येऊ शकते.
हार्मोनमध्ये बदल
टेस्टोरॉनचं प्रमाण कमी झाल्यानेही महिलांमध्ये कामेच्छा कमी होते. कोणत्याही महिलेमध्ये टेस्टोरॉनचं प्रमाण २० वर्ष वयापर्यत फार जास्त असतं आणि त्यानंतर हळूहळू वाढत्या वयासोबत हे प्रमाण कमी होत जातं. मोनोपॉज होईपर्यंत ही इच्छा थोडीफार शिल्लक असते. एक तथ्य हे सुद्धा आहे की, महिलांमध्ये वाढत्या वयासोबत एंड्रोजनचं प्रमाण कमी होत जातं. ज्यामुळेही त्यांच्यातील कामेच्छा कमी होऊ लागते.
शारीरिक समस्या
महिलांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा कमी होणे ही एक मेडिकल समस्याही असू शकते. मानसिक आजार जसे की, डिप्रेशन, तणाव किंवा दबाव या स्थितींमध्ये कामेच्छा हळूहळू घटत जाते. सोबतच फायब्रॉइड आणि थायरॉइडसारख्या समस्यांमुळेही लैंगिक क्षमता मानसिक आणि शारीरिक दृष्टीने कमी होऊ लागते.
तणावसंबंधी समस्या
शारीरिक संबंधाची इच्छा कमी होण्याच्या कारणांमध्ये औषधांचा भरपूर वापर हेही असू शकतं. ही औषधे डिप्रेशन आणि तणाव दूर करण्यासाठी घेतली जातात. गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन, ब्लड प्रेशर कमी करणाऱ्या औषधांचं सेवन केल्यानेही शारीरिक संबंधाबाबतची इच्छा कमी होते.