शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. याने दोघांमधील जवळीकता, प्रेम आणि दोघांचं नातं अधिक मजबूत होतं. हे कुणापासूनही लपलेलं नाही की, महिला बॉडी शेपबाबत फार जास्त विचार करतात. फिगरबाबत केल्या गेलेल्या कमेंट त्यांच्या मनाला लागतात. त्यामुळे लैगिंक जीवनात अनेक अडचणी येतात. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिला पार्टनरचं प्रशंसा किंवा कौतुक करून तुम्ही तुमची लव्ह लाइफ चांगली करू शकता. तुमच्याकडून करण्यात आलेल्या कौतुकाने त्यांना कम्फर्टेबल वाटेल आणि त्या रोमॅंटिक क्षणांचा हवा तसा आनंद घेऊ शकतील.
लैंगिक जीवनात नवा जोश
तज्ज्ञ सुद्धा याला गोष्टीला दुजोरा देतात की, तुम्ही जर तुमच्या पार्टनरचं कौतुक कराल तर रोमॅंटिक क्षण आणखी चांगले होतील. काही लोकांनी एक फार शुल्लक किंवा छोटी गोष्ट वाटू शकते. पण याने मानसिक रूपाने सकारात्मक प्रभाव पडतो. महिला सुद्धा पार्टनरची प्रशंसा करून त्यांच्यात सकारात्मकता जागवू शकतात. जर शारीरिक संबंधावेळी पार्टनरकडून योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल तर ही पद्धत वापरून बघू शकता.
२०० महिलांवर करण्यात आला रिसर्च
या रिसर्चमध्ये १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांचा समावेश करण्यात आला होता. हा रिसर्च जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. हा रिसर्च करण्यासाठी महिलांना त्यांच्या शरीराबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. त्यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांचे पार्टनर त्यांच्या शरीराबाबत काय विचार करतात.
या रिसर्चमध्ये महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबतही प्रश्न विचारण्यात आलेत. त्यांना विचारण्यात आले की, त्यांना किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव आला आणि त्यांची संतुष्टीची लेव्हल काय होती. तसेच त्यांच्याकडून हेही जाणून घेण्यात आले की, रोमांच आणि प्रेमावेळी त्यांना वेदना होतात की नाही.
काय निघाला निष्कर्ष?
या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेता आले की, ज्या महिलांना आपल्या लूक्स आणि फिगरबाबत पार्टनरकडून प्रशंसा मिळाली, त्या शारीरिक संबंधावेळी जास्त आनंदी होत्या. आणि त्यांना संतुष्टीचा अनुभवही आला. ज्या महिला त्याच्या बॉडी आणि लूक्सबाबत आनंदी राहत नाही, त्यांच्यापेक्षा या महिलांमध्ये सेक्स ड्राइव्हही अधिक होती. रिसर्चमधून असेही समोर आले की, इंटिमेट क्षणांदरम्यान जर महिलांची प्रशंसा केली गेली तर त्यांची कामेच्छा वाढते.
लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल!
लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर लगेच लघवीला न जाणं पडू शकतं महागात, कसं? ते वाचा...