वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध ठेवताना जोडीदाराच्या अपेक्षांवर खरं उतरणं, याची चिंता कधीना कधी सर्वांनाच भेडसावत असते. खासकरुन नव्यानेच नातं तयार झालं असेल तेव्हा अनेकदा हा विचार मनात येतो. मात्र याबाबत विचार करुन किंवा त्याची भीती बाळगून काहीही फायदा होणार नाही. यावर तज्ज्ञांचे काही खाय उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही तुमच्या लैंगिक जीवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल आणि तुमच्या मनातील भीतीही निघून जाईल.
तज्ज्ञांनुसार सर्वातआधी तर कोणत्याही नात्यात डोक्यातून नकारत्मक गोष्टींना बाहेर काढून सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. नात्यात तुम्ही त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत केलं पाहिजे ज्या तुमच्या हिताच्या आहेत. अशाप्रकारचा विचार येणं हा तुमच्यातील आत्मविश्वासाचा अभाव दर्शवतो. जर तुम्ही सतत याचाच विचार करत राहाल तर सगळंकाही ठिक असूनही तुम्ही चांगला आनंद मिळवू शकणार नाही. त्यामुळे स्वत:त विश्वास जागा करा.
जास्तीत जास्त लोक हा विचार करतात की, त्यांचा/त्यांची पार्टनर त्यांच्याबाबत काय विचार करत असेल. मनात हीच बाब राहते की, शारीरिक संबंध ठेवताना जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तो किंवा ती काय विचार करेल. याने नातं तर संपणार नाही ना? या गोष्टी मनात येत असतात. पण या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या जोडीदारासाठी चांगल्या असतील त्याचा विचार करावा. याने तुमचं आत्मविश्वास वाढेल.
खूप जास्त विचार करण्याऐवजी लैंगिक क्रियेचा मनसोक्त आनंद घ्या. जर तुम्ही संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतला जर जोडीदारालाही याचा आनंद होईल. चांगल्या लैंगिक क्रियेचा अर्थ प्रत्येकवेळी परमोच्च आनंद मिळणे हाच नाहीये. असा विचार करत रहाल तर लैंगिक क्रिया केवळ एक काम बनून राहिल. आता हे सगळं केल्यानंतरही तुमच्या मनात काही संशय किंवा भीती असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कर्म करा पण फळाची चिंता करु नका. हे तसं तर जीवनाचं तत्वज्ञान आहे. पण हे लैंगिक जीवनावरही लागू होतं. त्यामुळे चिंता, भीती आणि विचार सोडा तेव्हा तुम्हाला हवा तो आनंद मिळू शकेल.