सामान्यपणे असं मानलं जातं की, शारीरिक संबंध दोन लोकांना जवळ आणतो. खरंतर शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या धारणा असतात. जसे की, काही लोक दु:खी असले किंवा आनंदी असले तर शारीरिक संबंध ठेवतात. हे अनेकदा परिस्थितीवरही अवलंबून असतं. पण अशाही काही स्थिती असतात ज्यावेळी शारीरिक संबंध न ठेवणं कधीही चांगलं असतं.
लैंगिक क्रिया हे साधन नाही
दोघांनाही ही गोष्ट माहीत असली पाहिजे की, शारीरिक संबंध हा एकमेकांप्रति प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. पण याचा वापर कधीही साधन म्हणून करू नये. होऊ शकतं की, त्या क्षणाला शारीरिक संबंध ठेवून तुम्हाला आनंद मिळत असेल, पण नंतर यातून होणाऱ्या पश्तातापामुळे तुमच्या आनंदावर पाणी फेरलं जातं.
ब्रेकअप विसरण्यासाठी
जर तुमचं ब्रेकअप झालं असेल किंवा तुमचं रिलेशन फार टिकलं नसेल तर अशा स्थितीत शारीरिक संबंधाला हत्यार बनवू नका. अनेकदा असं होतं की, अशाप्रकारच्या नात्यातून बाहेर येण्यासाठी किंवा एक्सला विसरण्यासाठी काहीही करायला तयार होतो. मग त्यात फिजिकल रिलेशनशिपचाही समावेश होतो. याने भलेही तुम्हाला चांगलं वाटत असेल, पण खरंच असं करणं योग्य आहे का? म्हणजे एका तुटलेल्या नात्याला विसरण्यासाठी कुणी शारीरिक संबंधाचा आधार कसा घेऊ शकतं? जर तुम्हाला तुमच्या फीलिंग्सची जाणीव नसेल तर निदान दुसऱ्याच्या फीलिंग्सची तरी जाणीव ठेवावी.
रागात शारीरिक संबंध
असे म्हणतात की, राग माणसाला खाऊन टाकतो. कारण रागाच्या भरात कुणीही काहीही करून बसतं. त्यामुळे जेव्हा रागात असाल तेव्हा शारीरिक संबंध ठेवण्यापासून दूर रहा. त्यावेळी तुमच्या पार्टनरला काही नुकसानही होऊ शकतं.
मित्रांच्या दबावात
नेहमीच असं पाहिलं गेलं आहे की, मित्रांना प्रभावित करण्यासाठी अनेकजण काहीही करतात. त्यात शारीरिक संबंध सुद्धा आहेत. मित्रांच्या दबावात येऊन किंवा त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी तरूण मंडळी अनेकदा अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतात ज्यांना ते ओळखत नाहीत किंवा ज्यांच्यासोबत त्यांना शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. पण हे चुकीचं आहे.
कुणाला खूश करण्यासाठी
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो आणि काळजी करतो, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार होतो. मग ते शारीरिक संबंधही का असेना. काही लोक हे इच्छा नसूनही आपल्या पार्टनरच्या आनंदासाठी शारीरिक संबंध ठेवतात. पण असं करणं चूक आहे. कारण असं केल्याने तुमची नात्याप्रति आणि शारीरिक संबंधाप्रति इच्छा कमी होत जाईल.