कांदा एक असं कंदमूळ आहे जे नैसर्गिक कामोत्तेजनक म्हणून काम करतं. कांद्याचे सेवन केल्याने लैंगिक क्षमता आणि उत्तेजना वाढते हे सर्वांनीच ऐकलं असेल. पण असं का होतं? यातील कोणत्या गुणांमुळे लैंगिक जीवनाला फायदा होतो? याचं उत्तर अनेकांना माहीत नसतं. महत्त्वाची बाब ही आहे की, कांद्याचा फायदा महिला आणि पुरूष दोघांनाही समान होतो. चला जाणून घेऊ कांद्याचा लैंगिक क्षमतेला कशाप्रकारे फायदा होतो.
कांद्याने लैंगिक जीवनाला होणारे फायदे-
१) शुक्राणूंची संख्या वाढवतो - कांद्यामध्ये असणारे अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, आलं आणि कांद्यामुळे व्यक्तीची लैंगिक क्षमता आणि शुक्राणूंची संख्या वाढते. एक मोठा चमचा कांद्याचा रस आणि एक छोटा चमचा आल्याचा रस दिवसातून तीव वेळा सेवन केल्यास कामेच्छा वाढते आणि शक्तीही वाढते.
२) शक्ती वाढवतो - ज्या लोकांमध्ये स्टॅमिनाची कमतरता असते, ते लैगिक जीवनाचा पुरेसा आनंद घेऊ शकत नाहीत. मात्र कांद्याने तुमची ही समस्या दूर केली जाऊ शकते. कांद्यामध्ये फायटोन्यूट्रीएन्टस असतात. हे तत्त्व व्हिटॅमिन सी चं काम करतात. त्यामुळे इम्यून सिस्टम वाढतं. तसेच शरीराला टॉक्सिन फ्री करून स्टॅमिना वाढवण्यासही मदत करता.
३) रक्तप्रवाह चांगला होतो - कांदा हा सल्फाइडचं मोठा स्त्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल स्तर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते. याने हृदय निरोगी राहण्यासोबतच गुप्तांगांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आणि लैंगिक क्षमताही वाढते.
४) टेस्टास्टोरेन स्तर चांगला होतो - तरबीज यूनिव्हर्सिटी इराणमधील एका रिसर्चनुसार, ताज्या कांद्याच्या रसाने टेस्टास्टोरेनचा स्तर वाढतो. तसेच सेक्शुअल ऑर्गनही हेल्दी होतात.
कांद्याचा कसा कराल वापर?
कच्चा कांदा खावा - लाल आणि कांद्याची हिरवी पाल तुम्ही सलादमध्ये मिश्रित करून खाऊ सकता. याने लैंगिक क्षमता अधिक वाढते.
कांद्याचा रस - कांदा आणि आल्याचा रस तयार कऱण्यासाठी एका मध्यम आकाराच्या कांद्याच्या रसात थोडं आलं टाकून याचा रस तयार करा. या रसाचं दररोज सेवन केल्याने तुमची लैंगिक क्षमता वाढते.
कांद्याचं पाणी - हे कदाचितच तुम्ही ऐकलं असेल. हे विचित्र वाटत असलं तरी फार फायदेशीर आहे. अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन किंवा तीन कांदे उलडा आणि हे पाणी सकाळी व सायंकाळी सेवन करा. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वीही तुम्ही याचं सेवन करू शकता.
वेगवेगळ्या पदार्थांमधून - कांद्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्येही करू शकता. याचाही फायदा तुम्हाला होऊ शकतो.