बहुदा असाच विचार केला जातो की, जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे सगळं काही ठिक सुरु आहे. पण अनेकांची असणारी ही धारणा चुकीचं आहे. सतत शारीरिक संबंध ठेवल्याने शारीरिक संबंध ठेवण्यातील रस कमी होऊ शकतो, तसेच जोडीदार एकमेकांना टाळू शकतात, असा खुलासा एका शोधातून करण्यात आला आहे.
कार्नेल मेलन विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनी हा अभ्यास केला असून यात भारतीय वंशाच्या अभ्यासकांचाही समावेश आहे. यात सांगण्यात आलं आहे की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर यातून मिळणाऱ्या आनंदात आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या इच्छेत कमतरता येते. या अभ्यासकांच्या टीममधील अभ्यासक तमर कृष्णमूर्ती यांच्यानुसार, 'पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याऐवजी त्यांच्यातील इच्छा जागृत होईल, असं वातावरण त्यांनी तयार करायला हवं. सोबतच त्यांनी लैंगिक क्रिया आणखी मजेदार करायला हवी'.
शारीरिक संबंधातील वारंवारता आणि आनंद यातील संबंध जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १२८ जोडप्यांना इतर लोकांच्या तुलनेत अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर अभ्यासकांनी तीन महिन्यांनी दोन्ही समूहातील आनंदाच्या स्तराची मोजमाप केली. ज्या समूहातील दाम्पत्यांना जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता, त्यांच्यात आनंद वाढण्यापेक्षा कमी झाल्याचं आढळलं. या समूहातील जोडीदारांनी कामेच्छा कमी झाल्याचं आणि शारीरिक संबंध ठेवताना आनंद कमी मिळत असल्याचं सांगितलं.
कृष्णमूर्ती म्हणाले की, 'जोडीदारांमध्ये हे असं बघायला मिळण्याचं कारण जास्त शारीरिक संबंध ठेवणे हे कारण नाही. याचं कारण हे आहे की, त्यांना असे करायला सांगण्यात आले होते, त्यांनी स्वत:हून असे केले नाही'. शोधाच्या विपरीत अभ्यासकांचं असं मत आहे की, काही जोडपी स्वत:च्या भलाईचा विचार करुन कमी वेळा शारीरिक संबंध ठेवतात. त्यांचा असा विचार असतो की, योग्य दिशेने शारीरिक संबंधाची वारंवारता वाढवल्याने फायद्याचं असू शकतं.
‘इकॉनॉमिक बिहेवियर अॅंड ऑर्गेनायजेशन’ च्या अंकात प्रकाशित या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, यांच्याऐवजी आनंदी राहणाऱ्या लोकांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचा दर वाढू शकतो किंवा निरोगी लोकांमध्ये आनंद आणि शारीरिक संबंधाचा दर दोन्हींची वाढ होऊ शकते.