कोणतीही व्यक्ती पार्टनरसोबत पहिल्यांदा ठेवलेले शारीरिक संबंध कधीही विसरू शकत नाहीत. कारण ते क्षण त्यांच्यासाठी फार जास्त खास असतात. या क्षणांचा मनसोक्त आनंद घेतला जातो. प्रत्येकाकडे पहिल्या शारीरिक संबंधाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. पण काही कारणांमुळे पहिल्या संबंधावेळी पुरूष फार जास्त वेळ इरेक्शन रोखून ठेवू शकत नाहीत. पहिली वेळ असल्याने त्यांचा असा समज असतो की, चांगलं परफॉर्म करावं, पण ते लवकरच इजॅक्यूलेट होतात. ही फारच सामान्य समस्या आहे. ही समस्या नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. या समस्येची काही कारणे जाणून घेऊया.
इरेक्टाइल डिस्फंक्शन
ही पुरूषांमध्ये असलेली एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे लैंगिक क्रियेचा हवा तो आनंद घेता येत नाही. ही समस्या फार गंभीर नसते, पण यामुळे पुरूषांवर दबाव सतत असतो.या समस्येवर स्वत: उपाय केला जाऊ शकतो. सुरुवातीला ही समस्या फार हैराण करते, पण नंतर हळूहळू कमी होत जाते. जर ही समस्या नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांना सल्ला घेऊन उपचार करावे.
शीघ्रपतन (प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशन)
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना पुरूष त्यांच्या परफॉर्मन्सबाबत फार चिंतेत आणि विचारात असतात. ज्यामुळे त्यांना शीघ्रपतनाची समस्या जाणवते. शीघ्रपतानाची वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यातील हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल. त्यासोबतच पुरूष त्यांच्या महिला पार्टनरसोबत ही समस्या शेअरही करू शकत नाही. त्यामुळे ही समस्या अधिक वाढते. तसेच पहिल्या संबंधावेळी अधिक उत्तेजना असणे हेही शीघ्रपतनाचं कारण असू शकतं.
नियंत्रण शक्तीबाबत कमी माहिती
जर तुम्ही पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवणार असाल तर हे स्पष्ट आहे की, याचा तुम्हाला काही अनुभव नसणार. त्यामुळे अनेक वर्षांपासून याबाबत असलेल्या उत्सुकतेमुळे तुम्ही उत्तेजना नियंत्रित करण्यास अपयशी ठरता. हेच कारण आहे की, संबंध ठेवताना पुरूषांचं लगेच इरेक्शन होतं. ही समस्या सुद्धा काळानुसार कमी होत जाते. या गोष्टी तुम्ही अनुभवातून शिकत जाल. या कारणामुळे अनेकांना पहिल्या संबंधावेळी जास्त वेळ टिकून न राहण्याची समस्या होते.