अनेक महिलांना रात्री शारीरिक संबंध ठेवल्यावर सकाळी व्हजायनामध्ये सूज आल्याचं जाणवतं. पण अनेकांना ही सूज का आली? प्रश्नाचं उत्तरच माहीत नसतं. या कारणामुळे पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची थोडी भितीही काही महिलांच्या मनात बसत असेल. तुम्हालाही कधीना कधी अशी समस्या झाली असेल तर याची ५ कारणे तुम्हाला माहीत असायला हवी.
लुब्रिकन्टचा वापर न करणं
जर शारीरिक संबंधावेळी प्रायव्हेट पार्टमध्ये नैसर्गिक ओलावा नसेल तर तज्ज्ञ अनेकदा लुब्रिकन्टचा वापर करण्याचा सल्ला देतात. तुम्हालाही अशी समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांच्या मदतीने लुब्रिकन्टचा वापर करावा. नाही तर तुम्हाला व्हजायनामध्ये सूज येऊ शकते. लॅटेक्सची अॅलर्जी असणे
काही लोकांना लॅटेक्स कंडोमची अॅलर्जी असते. जर अशा महिलांचे पार्टनर लॅटेक्सचे कंडोम वापरत असतील तर त्यांच्या व्हजायनामध्ये सूज, ड्रायनेस आणि इरिटेशनची समस्या होऊ शकते. अशावेळी पार्टनर्सने नॉन लॅटेक्स कंडोमचा वापर करावा.
एंडोमेट्रियॉसिस आजार
एंडोमेट्रियॉसिस गर्भाशयात होणारी एक समस्या आहे. ज्यात एंड्रोमेट्रियम टिश्यूने गर्भाशयात एक थर साचतो. गर्भाशयाचा अंतर्गत विकास करणारे एंडोमेट्रियम पेशींमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि त्या गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतात. या आजारामुळे शारीरिक संबंधावेळी सामान्यापेक्षा जास्त वेदना होतात आणि संबंधानंतर ओटी पोटाच्या भागात वेदना व व्हजायनामध्ये सूज येऊ शकते.
यूटीआय समस्या
जर तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय समस्या असेल तर शारीरिक संबंधावेळी जास्त वेदना होतात आणि संबंधानंतर व्हजायनामध्ये सूज येते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्यावे. यूरिन टेस्टच्या माध्यमातून या टेस्टची माहिती मिळवता येऊ शकते.
व्हजायनिसमस समस्या
ही एक अशी समस्या आहे ज्यात ओटी पोटाच्या मसल्स अधिक अॅक्टिव होतात. याचा अर्थ हा की, शारीरिक संबंधावेळी येथील मांसपेशी टाइट होतात आणि व्हजायनल कॅनाल बंद होतं. ज्यामुळेही सूज येऊ शकते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.