(Image Credit : WellVenue)
शारीरिक संबंध हा रिलेशनशिपचा एक असा भाग आहे ज्याने तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अधिक जवळ येता. पण जर तुम्ही याकडे फार गंभीरतेने बघत नसाल आणि याचं महत्त्व तुम्हाला माहीत नसेल तर शारीरिक संबंधामुळे तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे अशाच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं लैगिक जीवन अधिक चांगलं एन्जॉय करू शकाल.
शेअरिंगबाबत सावधगिरी बाळगा
तुमच्या लैंगिक जीवनाबाबत तुमच्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत काय आणि किती शेअर करत याकडे लक्ष द्या. मग त्या चांगल्या गोष्टी असोत वा वाईट असोत. प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. तुम्ही पार्टनरसोबत कितीदा शारीरिक संबंध ठेवलेत किंवा किती दिवसांपासून तुम्ही काहीच केलं नाही, या गोष्टीही कुणाशी शेअर करण्याची गरज नाही. तुमचं लैगिक जीवन नेहमी खाजगी ठेवा आणि जर कशाप्रकारची काही अडचण येत असेलच तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा
हे फार गरजेचं आहे की, तुम्ही तुमचा वेळ अशा लोकांसोबत किंवा कपल्ससोबत घालवा जे नेहमी आनंद राहतात आणि जीवनाप्रति नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात. अशा लोकांसोबत वेळ घालवून तुमचं नातं अधिक चांगलं करा. जर तुम्ही रिलेशनशिपबाबत नकारात्मक विचार मनात ठेवणाऱ्या लोकांसोबत रहाल तर तुम्ही तसेच विचार करायला लागाल. याने तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं.
हे विसरू नका
किस करण्याचा केवळ हाच अर्थ नाही की, तुम्ही शारीरिक संबंधावेळीच पार्टनरला इंटेन्स किस करावा. तुम्ही दिवसातून कितीही वेळा पार्टनरला किस करू शकता. किसचा अर्थ प्रेम, सुरक्षा, जिव्हाळा आणि सहानुभूती असाही होतो. या गोष्टींमुळे तुमचं लैंगिक जीवन अधिक चांगलं होण्यास नक्कीच मदत होईल.
बदल स्वीकारा
कोणतंच नातं नेहमी एकसारखं राहत नसंत. १० वर्षांआधी तुमचं नातं जसं होतं तसंच नेहमी रहायला हवं असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. असा विचार करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या पार्टनरसाठीही चुकीचं आहे. हे मान्य करा की, बदलत्या काळासोबत नातंही बदलत असतं, वागणंही बदलत असतं. हे मान्य केलं तरच तुम्ही तुमचं लैंगिक जीवन चांगलं जगू शकाल.