अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की, अनेकजण याबाबत संभ्रमात असतात की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणं योग्य असतं किंवा नाही. यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यात काहीच चुकीचं नाहीये. पण अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं. काळजी घेण्याच्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या खालीलप्रमाणे सांगता येतील.
बेडवर टॉवेल टाका - मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणं सोपं असतं असं अजिबातच म्हणता येणार नाही. ब्लीडिंग होत असल्या कारणाने शारीरिक संबंध ठेवताना तुमची बेडशीट खराब होऊ शकते. त्यावर रक्ताचे डाग पडू शकतात. अशावेळी काही करण्याआधी जोडीदाराच्या कंबरेखाली गर्द रंगाचा एखादा कपडा किंवा टॉवेल ठेवा.
नंतर स्वच्छता - मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यावर तुम्ही स्वत:ची आणि कपड्यांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करावी. आंघोळ करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केल्यास अधिक चांगले. याने कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका तुम्हाला होणार नाही.
स्वच्छतेची घ्या काळजी - मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना यीस्ट इन्फेक्शन(Yeast Infection) होण्याचा धोका अधिक वाढत असतो. अशात शारीरिक संबंध ठेवण्याआधी आणि नंतर गुप्तांगाच्या आजूबाजूची चांगली स्वच्छता करायला विसरु नका. खासकरून पुरुषांनी गुप्तांच्या वरचा भागाची चांगली स्वच्छता करावी. यात इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.
वेगवेगळ्या पोजिशन टाळाच - इतर वेळी वेगवेगळ्या पोजिशनच्या मदतीने शारीरिक संबंध ठेवल्यास काही हरकत नाही. पण मासिक पाळीदरम्यान वेगवेगळ्या पोजिशन किंवा वुमन ऑन टॉपसारख्या पोजिशन अजिबात ट्राय करु नये. याने महिला जोडीदाराची अडचण वाढू शकते आणि त्यांना वेदनाही अधिक होण्याचा धोका असते. त्यामुळे सामान्य पोजिशनचाच इथे वापर करावा.
कंडोमचा वापर - जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताय याचा अर्थ हा नाही की, तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. यादरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कंडोमचा वापर केलेला कधीही चांगला.
अधिक उत्साह नको - मासिक पाळीमुळे आधीच महिलांना वेदना होत असतात. काही महिलांची चिडचिड वाढलेली असते. अशात त्यांना शारीरिक संबंध ठेवून आनंद मिळू शकतो. पण अशावेळी फार जास्त जोर-जबरदस्ती किंवा उत्साहात राहू नका. याने महिलांना जास्त वेदना होण्याचा धोका असतो.