अनेकजण बेडवर गेल्यावर थेट पेनिस्ट्रेटिव सेक्स करू लागतात. पण हे ध्यानात घेतलं पाहिजे की, तुमच्या फीमेल पार्टनरला यात काहीही आनंद मिळणार नाही. कारण जास्तीत जास्त महिलांना ऑर्गॅज्म म्हणजेच परमोच्च सुखापर्यंत पोहोचवण्यासाठी फोरप्ले फार गरजेचा असतो. थेट काही करण्यापेक्षा शारीरिक संबंधाआधी उत्तेजना वाढवण्यासाठी फोरप्ले महत्त्वाचा ठरतो. या अजिबातच दुमत नाही की, अनेकदा महिला त्यांच्या पुरूष जोडीदाराला खूष करण्यासाठी किंवा संतुष्टी झाली आहे हे दाखवण्यासाठी फेक ऑर्गॅज्म करतात. पण हे जाणून घेणं गरजेचं आहे की, ऑर्गॅज्म पुरूषांसाठी वेगळा आणि महिलांसाठी वेगळा असतो. महिलांना ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचवण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत.
फोरप्लेचं महत्त्व ओळखा
जर तुम्ही पार्टनरसोबत थेट शारीरिक संबंध ठेवत असाल तर आणि तुमचं समाधान झाल्यावर उठून जात असाल तर याने तुमच्या पार्टनरला अजिबात आनंद मिळणार नाही. कारण अनेक महिलांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळण्यासाठी फोरप्लेची गरज असते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उत्तेजना वाढवणाऱ्या भागांवर किस करावे, याने त्यांची उत्तेजना वाढेल.
काय चांगलं, काय नाही...
पार्टनरच्या अंगावर विनाकारण बोटं फिरवत बसण्यापेक्षा त्यांना हे विचारा की, तुम्ही जे करताय ते त्यांना आवडतंय का? किंवा त्यांना काय पसंत आहे? तुम्ही जे करताय त्याने त्यांची उत्तेजना वाढत आहे की नाही? यावर चर्चा करून तुम्ही दोघेही दोघांना आनंद मिळेल असं काही करू शकता. कारण शारीरिक संबंधाचा उद्देश दोघांनाही आनंद मिळावा हा आहे.
किस करणं महत्त्वाचं
किस करणे हा कामुक आणि आनंददायी अनुभव असतो. त्यामुळे किस ओठ आणि चेहऱ्यापुरते मर्यादित ठेवू नका. पार्टनरच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही किस करून त्यांची उत्तेजना वाढवू शकता. अर्थातच त्यांची उत्तेजना वाढल्यावर त्यातून तुम्हालाही आनंद मिळतोच.
घाई करू नका
अनेकदा असं होतं की, पुरूष पार्टनर्स हे घाईने करतात आणि त्यातून दोघांच्याही हाती फारसं काही लागत नाही. घाई न करता शांतपणे जर शारीरिक संबंधाचा आनंद घेतला तर दोघांनाही परमोच्च आनंद मिळण्यास मदत होईल. अनेकदा महिलांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळण्यास वेळ लागतो. अशावेळी पुरूषांनी घाई करून स्वार्थीपणा केला तर महिला पार्टनरना संतुष्टीचा आनंद होणार नाही.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे माहिती म्हणूण दिलेले आहेत. ते फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अधिक चांगले होईल. कारण कुणाला काही वेगळ्या समस्या असू शकतात. त्यामुळे अशात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.)