(Image Credit : medicalnewstoday.com)
सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा आणि गर्भनिरोधक गोळ्या यांच्यात काही संबंध आहे का? खरंतर यावर नेहमीच समज-गैरसमज, शंका-कुशंका होत असतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे कामेच्छा कमी होते का? यावरही अनेकदा चर्चा होत असते. पण असं प्रत्येकासोबत होत नाही. बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांची कामेच्छा कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाही, हे आमचं नाही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.
हजारो महिलांवरील रिसर्चमधून दावा
यूरोपियन जर्नल ऑफ कॉन्ट्रसेप्शन अॅन्ड रिप्रॉडक्टिव हेल्थ केअरमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १९७८ ते २०११ दरम्यानच्या ३३ वर्षात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासांचे विश्लेषण केले. या अभ्यासात ८ हजार ४०० महिलांचा समावेश करून घेण्यात आला होता. ज्या बर्थ कंट्रोल पिल्सचं सेवन करत होत्या.
या एकूण महिलांपैकी २२ टक्के महिला म्हणाल्या की, गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करून त्यांना कामेच्छा वाढल्याचं जाणवलं. तर १५ टक्के महिला म्हणाल्या की, या गोळ्यांच्या सेवनानंतर त्यांची कामेच्छा कमी झाली. तर ६३ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही प्रकारची बदल जाणवला नाही.
नेमकं काय होतं?
जास्तीत जास्त गायनॅकॉलॉजिस्टचं सुद्धा हेच मत असतं की, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने कामेच्छा कमी होण्याची तक्रार १०० पैकी केवळ एका पेशन्टमध्ये बघायला मिळते. महिलांना काळानुसार सेक्सबाबत इच्छा कमी जाणवणे ही सामान्य बाब आहे. पण यासाठी गर्भनिरोधक गोळ्या जबाबदार असतात, असं म्हणणं कठीण आहे.
कामेच्छा कमी होण्याची वेगळी कारणे
महिलांमध्ये कामेच्छा कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, आरोग्याशी संबंधित समस्या, वय, नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्ट्रेस, सिगारेट आणि अल्कोहोलचं सेवन इत्यादी. जास्त बर्थ कंट्रोल गोळ्यांमध्ये फीमेल सेक्स हार्मोन्स एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचं मिश्रण राहतं. पण वेगवेगळ्या गोळ्यांचा वेगवेगळा फॉर्म्युला असू शकतो.