बदलती लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणाव हे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी असण्याचं मुख्य कारणं आहेत. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचं हार्मोन कामेच्छा वाढवतं. सामान्यपणे वाढत्या वयासोबत टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होऊ लागतो. पण अलिकडे ३० वयाच्या पुरुषांमध्येही टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. पण चांगल्या वैवाहिक जीवनासाठी हा टेस्टोस्टेरॉनचा स्तर योग्य ठेवणे गरजेचं आहे. असे न केल्यास तुम्हाला नंतर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊ सेक्स हार्मोन वाढवण्यासाठी काय करावे.
१) दिवसाची सुरुवात हाय प्रोटीन आहाराने करावी. यासाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अंडी, हिरव्या भाज्या आणि शेंगदाणे खाऊ शकता. कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो.
२) पुरुषांच्या कंबरेवर जेवढी जास्त चरबी असेल तितका टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे वजन कमी करण्यावर जास्त भर द्यावा. एब्ससाठी काही खास एक्सरसाइजना रुटीनचा भाग केलं पाहिजे. एक्सरसाइजने शरीर मजबूत होतं आणि लैंगिक क्षमताही वाढते.
३) झोपेचाही टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो. तुम्ही किती तास झोपता याचा प्रभाव तुमच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या निर्मितीवर पडतो. तज्ज्ञांनुसार, रात्री कमीत-कमी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. कारण शरीरात ७० टक्के टेस्टोस्टेरॉन झोपेत असताना तयार होतात.
४) एका शोधातून समोर आले आहे की, जे पुरुष वेट लिफ्टिंग एक्सरसाइज करतात, त्यांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये ४९ टक्के वाढ होते. तुम्हाला वेट लिफ्टिंग शक्य नसेल तर कोणतीही एक्सरसाइज केल्यासही चालेल.
५) पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण वाढवण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे त्यांनी आहारात झिंक आणि मॅग्नेशिअमसारखे खनिज मिळतील अशा पदार्थांचा समावेश करावा.
६) अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोनमध्ये कमतरता येते. काही शोधातून असे समोर आले आहे की, नशा करणाऱ्या पुरुषांचं शरीर केवळ ५० टक्केच टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं.
७) तसेच गोड पदार्थ कमी खावे. कारण याने शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच शरीरात इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं. जेव्हा गोड काही खाल्लं जातं. तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपोआप कमी होतं. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावे.