अनेकदा आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर लैंगिक जीवनातील उत्साह कमी होऊ लागतो. असं त्या कपल्ससोबत अधिक होतं जे लैंगिक जीवन एन्जॉय करत असतात, पण अचानक त्यांच्या आयुष्यात शारीरिक संबंधासाठी उदासीनता, कंटाळवाणेपणा यायला लागतो. अशा लोकांना सेक्स डिटॉक्सची गरज असते. सेक्स डिटॉक्समुळे तुमचं लैंगिक जीवन आधीपेक्षा चांगलं होऊ शकतं.
या डिटॉक्सिफिकेशनने तुमच्यातील अरसिकता दूर होते आणि नव्या जोश, उत्सा तुमच्या जीवनात येतो. यासाठी तुम्हाला लैंगिक जीवनात काही दिवसांचा ब्रेक घ्यावा लागेल. असं केल्यास खरंच तुम्हाला लैंगिक जीवनाचा एक वेगळाच आनंद मिळू शकेल.
डिटॉक्सिफिकेशनच्या माध्यमातून टॉक्सिन बाहेर काढलं जातं. जेणेकरून शरीरात नवा जोश यावा. याने शरीर एनर्जेटिक आणि रिफ्रेश होतं. त्याचप्रमाणे लैंगिक जीवनात सेक्स डिटॉक्सिफिकेशनची गरज असते. म्हणजे रिलेशनशिपमध्ये थोडा ब्रेक घ्या. शारीरिक संबंध ठेवणे काही दिवसांसाठी बंद करा. इच्छा झाल्यावरही स्वत:वर कंट्रोल ठेवा. जमल्यास दोघेही काही दिवसांसाठी वेगळे रहा. दूर गेल्यावर तुमच्यातील जवळीकता अधिक वाढेल.
सेक्स डिटॉक्ससाठी लैंगिक जीवनात कमीत कमी एक महिन्याचा किंवा दोन महिन्यांचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. सोबत राहूनही तुम्ही काही दिवसांसाठी वेगवेगळ्या रूममध्ये झोपा. दोन मित्रांसारखं राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं बाकीचं रूटीन तसंच ठेवा पण पर्सनल टाइम तुम्ही सोबत घालवू नका. ऐकायला हे भलेही विचित्र वाटत असलं तरी हे रिलेशनशिप रिचार्ज करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
सेक्स डिटॉक्सने तुमचं लाइफ तसंच होईल जसं तुम्ही पहिल्यांदा भेटल्यावर होतं. याने तुमच्या लाइफमध्ये एक वेगळा उत्साह येईल. तुम्हाला तुम्ही पार्टनरला वेगळ्या प्रकारे भेटत असल्याची जाणिव होईल. डिटॉक्सिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल. एकमेकांच्या आवडीनिवडींना तुम्ही पुन्हा महत्त्व देऊ लागाल.