(Image Credit :astropsychicreading.com)
अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये ऑफिस आणि घर यात बॅलन्स करणं तारेवरच्या कसरतीसारखं झालं आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि दोन्हीकडे स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही कधी कामाच्या वाढत्या तणावामुळे तुमचं लैंगिक जीवन विस्कळीत होत असल्याचा विचार केलाय का? ऑफिसमधील कामाचा अतिरिक्त दबाव हा तुमच्या बेडरूम लाईफसाठी चांगला नाही. तणावामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. चला जाणून तणावामुळे तुमचं लैंगिक जीवन कसं प्रभावित होत आहे.
हार्मोन्सचं असंतुलन
तणावामुळे रिलीज होणारे हार्मोन आपल्या डायजेशनला प्रभावित करू शकतात. याने तुम्हाला जास्त सूस्त झाल्यासारखं वाटेल आणि तुमचं वजन वेगाने कमी होऊ लागेल. तसेच यात तुमच्या लूकबाबत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागेल. जर तुम्ही तुमच्या शरीराला पसंत कराल नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने बेडरूममध्ये परफॉर्म करू शकणार नाहीत.
कामेच्छा कमी होईल
कोर्टिसोल तणावातून रिलीज होणारा हार्मोन आहे. आपल्या शरीराला या हार्मोनची गरज तर असते, पण कमी काळासाठी आणि कमी प्रमाणात. पण जर कोर्टिसोल फार जास्त काळासाठी, जास्त प्रमाणात रिलीज होत असतील तर याने सेक्स हार्मोनवर दबाव पडतो. याने तुमची कामेच्छा कमी होऊ लागते.
तणावामुळे बिघडतं नातं
जेव्हा आपण तणावग्रस्त होतो तेव्हा आजूबाजूच्या गोष्टींवरही त्याचा प्रभाव होतो. तणावामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या इच्छा किंवा इशाऱ्यांना समजू शकत नाहीत. तुमच्या निराश राहिल्याने तुमचे आनंदाचे क्षणही निराशेच्या जाळ्यात अडकतात. हे नियमित होत राहिलं तर तुमचं नातं बिघडू शकतं.
प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन
समाजातील अनेक लोक वास्तविक परिस्थितींपासून पळण्यासाठी मद्यसेवन करतात यात काहीच दुमत नाही. तसेच नशेच्या स्थितीत का होईना त्यांना त्यांच्यासाठी आनंदाचे काही क्षण तयार करता यावे. यामुळे अनेकदा लोक अल्कोहोलचं अधिक सेवन करू लागतात. याने लैंगिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. खासकरून पुरूषांमध्ये इज्यॅक्युलेशनची समस्या अधिक होते.