लैंगिक जीवनाबाबत पुरुष आणि महिला दोघांच्याही मनात काहीना काही प्रश्न सतत पडत असतात. भारतात आजही यावर खुलेपणाने चर्चा होताना दिसत नाही. अनेकांना शीघ्रपतन, कमजोरी, निरसता अशा वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात. वेगवेगळ्या समस्यांची वेगवेगळी कारणे आहेत. पण या सर्वात एका समान म्हणजे तुमचा आहार. तज्ज्ञ सांगतात की, तुमचा आहार चांगला नसेल तर तुमचं लैंगिक जीवनही चांगलं राहणार नाही.
अनेकदा आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी येतात. याचं कारण तुमचं रात्रीचं जेवण असू शकतं. तज्ज्ञ असं सांगतात की, तुम्ही जे काही खाता त्याचा खोलवर प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. खाण्याचा तुमच्या जीवनातील प्रत्येक त्या गोष्टीशी संबंध असतो. ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो.
याचाच अर्थ असा की, तुमच्या खाण्या-पिण्याचा तुमच्या लैंगिक जीवनाशीही आहे. रात्रीच्या जेवणाचा लैंगिक जीवनावर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारे प्रभाव होतो. अशावेळी तुम्ही रात्री काय खाता किंवा कधी खाता हे महत्त्वाचं ठरतं. जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवणार असाल तर रात्री हलका आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्यासोबतच दुपारच्या जेवणाकडेही लक्ष दिलं पाहिजे.
रात्री शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी कमीत कमी अडीच तासआधी जेवण करायला हवं. जेणेकरुन जेवण चांगल्याप्रकारे पचन होईल आणि शारीरिक संबंध ठेवताना कोणतीही अडचण येणार नाही. असे बघितले गेले आहे की, काही लोक रात्री जेवणासोबत मद्यसेवनही करतात. यामुळे पुरुषांमधील उत्तेजना कमी होते. आणि शारीरिक संबंध योग्यप्रकारे प्रस्थापितही होण्यास अडचण होते.
या कारणांनी तज्ज्ञ सांगतात की, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. फळं, हिरव्या भाज्यांचं सेवन करावं. याने तुमचं लैंगिक जीवन तर चांगलं राहिलंच सोबतच आरोग्यही निरोगी राहिल. महत्त्वाची बाब म्हणजे तणाव कमी होईल आणि या कारणाने तुम्ही चांगलं लैंगिक जीवन जगू शकाल.