(Image Credit : sudurpaschhim.blogspot.com)
अनेकदा कपल्सच्या सुरळीत सुरू असलेल्या लैंगिक जीवनात त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांना कामेच्छा कमी होण्याची समस्या होते. याला मुख्य कारण असतं ते शरीरात आयर्नची कमतरता. सामान्यपणे पुरूष आणि महिला दोघांमध्येही आयर्नच्या कमतरतेचा प्रभाव बघायला मिळतो. जर तुम्हालाही तुमच्या लैंगिक जीवनात काही समस्या असतील तर वेळीच आयर्न आणि रक्ताची टेस्ट करून घ्या.
महिलांवर काय होतो प्रभाव
ज्या महिलांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते, त्यांच्यात सेक्शुअल रिलेशनबाबत रस कमी होतो. त्या शारीरिक संबंध पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. त्यासोबतच त्यांना पीरियड्समध्ये जास्त स्त्राव किंवा कमी स्त्राव अशा समस्याही होतात. शारीरिक संबंधात अरसिकता आल्याने त्यांच्या नात्यावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
पुरूषांवर काय पडतो प्रभाव
ज्या पुरूषांमध्ये आयर्नची कमतरता असते, त्यांच्या लैंगिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. एकतर आयर्नची कमतरता असल्याने सेक्स ड्राइव्ह नकारात्मक प्रभाव पडतो म्हणजे कामेच्छा कमी होऊ लागते. सोबतच पुरूषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्याही होऊ लागते. ही दोन्ही लक्षणे एकत्र एकाचवेळी दिसतील हे गरजेचं नाही. यातील एकही दिसू शकतं.
शरीर साथ न देणं
तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवायचा आहे आणि त्या खास क्षणांचा आनंद घ्यायचा आहे पण थकव्यामुळे तुमचं शरीर साथ देत नाही. अशावेळी हे समजून घ्या की, तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता आहे. वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही समस्या दूर करा.
महिला असो वा पुरूष बेडवर पायांमध्ये अस्वस्थता, खाज येणे किंवा पायांमध्ये जळजळ होणे अशा गोष्टी होतात. असं काही तुम्हाला होत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्याचं हे लक्षण आहे. ही समस्या आराम करताना अनेकदा जाणवते.
सतत खराब राहतो मूड
आयर्नची कमतरता होत असल्याने तुमचा मूडही खराब राहतो आणि सतत डोकेदुखीची तक्रारही करता. यावेळी होणारी वेदना ही तुम्हाला अधिक त्रास देऊ शकते.
फ्रस्ट्रेशनचे शिकार
मूड स्विंग्स, थकवा, चिडचिडपणा या समस्या देखील तुमच्यात आयर्नची कमतरता असल्याचं लक्षण आहे. अशा स्थितीत व्यक्तीच्या स्वभावात नेहमी निराशा आणि फ्रस्ट्रेशन राहतं.