जेव्हा तुमचं शरीर मागणी करतं तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवता की, मनात शारीरिक संबंधाची इच्छा तयार होते? आता तुम्ही म्हणाल हा असा कसा प्रश्न? पण अनेकांना हे माहीत नसतं की, कामेच्छा दोन प्रकारची असते. कधी तुम्हाला स्वाभाविक इच्छा(स्पॉन्टेनिअस) होते तर कधी कधी प्रतिक्रियाशील इच्छा(रिस्पॉन्सिव) होते. चला जाणून घेऊ या दोन्ही प्रकारांबाबत....
स्पॉन्टेनिअस ड्राइव्ह
जेव्हा तुम्ही नाही तर तुमचा मेंदू शारीरिक संबंधाची मागणी करतो तेव्हा त्याला स्पॉन्टेनिअस सेक्स ड्राइव्ह म्हणतात. कधी कधी असं होतं की, तुमच्या डोक्यात शारीरिक संबंधाचा विचार येतो आणि तुम्हाला शारीरिक संबंधाची इच्छा होते. असं अनेकदा पॉर्न पाहताना किंवा एखाद्या कपलला जवळ येताना पाहिलं तर होतं. रिसर्चनुसार, पुरूषांमध्ये महिलांपेक्षा अधिक स्पॉन्टेनिअस ड्राइव्ह असते.
रिस्पॉन्सिव ड्राइव्ह
रिस्पॉन्सिव ड्राइव्ह तेव्हा होते जेव्हा शरीर शारीरिक संबंधाची मागणी करतं. पुरूषांमध्ये असं इरेक्शनसोबत होतं तर महिलांमध्ये प्रायव्हेटमध्ये तणाव निर्माण होतो. रिस्पॉन्सिव ड्राइव्ह महिलांमध्ये जास्त असते.
कोणती ड्राइव्ह जास्त चांगली?
जर तुम्हाला असं वाटत असेल की, स्पॉन्टेनिअस ड्राइव्ह चांगली आहे, कारण केवळ शारीरिक संबंधाचा विचार करूनच शारीरिक संबंधाचा इच्छा जागृत होते. तर हे असं नाहीये. अशात स्थितीत केवळ मेंदू शारीरिक संबंधासाठी तयार असते आणि त्यामुळे कदाचित या स्थितीत तुम्ही शारीरिक संबंधाचा पुरेसा आनंद घेऊ शकणार नाहीत. याआधी वार्मअप गरजेचा असतो आणि स्पॉन्टेनिअस ड्राइव्हमध्ये नेहमीच लोक वार्मअपकडे दुर्लक्ष करतात.
तुमची ड्राइव्ह समजून घ्या
दोन्ही प्रकारच्या ड्राइव्ह जाणून घेऊन तुम्ही तुमची इच्छा आणि पार्टनरला चांगलं समजून घेऊ शकता. त्यानंतर तुमचं लैंगिक जीवन आणखी मजेदार आणि आनंदी होऊ शकतं. दरम्यान असं अजिबात नाही की, एका व्यक्तीमध्ये केवळ एकाच प्रकारची सेक्स ड्राइव्ह असेल. एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या वेळेवर वेगवेगळ्या सेक्स ड्राइव्ह असू शकतात. पण या दोन मुख्य आहेत.