जेव्हा विषय खाण्याच्या टेस्टचा असतो तेव्हा प्रत्येकाचीच खाण्याची आवड वेगवेगळी असते. कुणाला फार जास्त तिखट आणि मसालेदार आवडतं तर कुणाला तिखट अजिबात चालत नाही. कुणाला गोड आवडतं तर कुणाला आंबट पदार्थ आवडतात. आज आम्ही याबाबत यासाठी बोलतोय कारण एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे की, तिखट आवडण्याचा आणि नावडण्याचा तुमच्या लैंगिक जीवनाशी काय संबंध असतो.
काय सांगतो रिसर्च?
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुम्हाला फार जास्त तिखट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील. तर असे लोक बेडरूममध्येही त्यांचं लैंगिक जीवन फार स्पायसी आणि रोमांचक ठेवतात.
जास्त शारीरिक संबंध
OnePoll कडून करण्यात आलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष याकडे इशारा करतात की, ज्या लोकांना जास्त तिखट खायला आवडतं ते कमी तिखट खाणाऱ्यांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. या सर्व्हेमध्ये २ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं आणि त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांना त्यांच्या लाइफस्टाइलबाबत, पर्सनॅलिटीबाबत आणि खाण्यात तिखट-मसालेदार आवडतं का? असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना तिखट पदार्थ पसंत करण्यावरून रेटींगही देण्यास सांगण्यात आलं.
काय निघाला निष्कर्ष
सर्व्हेचा निष्कर्ष हे सांगतो की, जे लोक पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी त्यात हॉट सॉस किंवा तिखट वरून घेतात ते लोक महिन्यातून ५.३ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. तर तिखट अजिबातच न खाणारे लोक महिन्यातून ३.४ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. म्हणजे हे स्पष्ट होतं की, तिखट खाणारे लोक जास्त शारीरिक संबंध ठेवतात.
अॅडव्हेंचरसही असतात
जास्त तिखट खाण्याचा संबंध केवळ बेडरूममध्ये जास्त अॅक्टिव असणं इतकाच नाहीये. तर जास्त तिखट खाणारे लोक हे कमी तिखट खाणाऱ्या लोकांपेक्षा अधिक अॅडव्हेंचरस असतात. अधिक तिखट पदार्थ खाणारे लोक कमी तिखट खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त फिरतात. जास्त आनंदी राहतात, जास्त सामाजिक असतात आणि जास्त एक्सरसाइजही करतात.