(Image Credit : theintimatecouple.com)
अनेक वर्षांपासून अनेकांमध्ये असा समज आहे की, शारीरिक संबंधानंतर बेडवर तशात झोपून राहणाऱ्या महिला गर्भवती राहण्याची शक्यता अधिक असते. पण एका रिसर्चमध्ये याबाबत वेगळंच सांगण्यात आलं आहे. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, शारीरिक संबंधानंतर बेडवर झोपून राहिल्याने महिला गर्भवती होऊ शकते हा समज चुकीचा आहे. अभ्यासकांनी ५०० दाम्पत्यांवर याबाबत अभ्यास केला होता. यातून समोर आलेले तथ्य फिनलॅंडमध्ये आयोजित एका फर्टिलिटी कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आले होते.
या अभ्यासात काही महिलांमध्ये कृत्रिम वीर्यारोपण केल्यानंतर त्यांना १५ मिनिटे बेडवर तसेच पडून राहण्यास सांगितले. तर काही महिला लगेच बेडवरून उठून गेल्या. यातून अभ्यासकांना आढळलं की, ज्या महिलांना बेडवर तसंच पडून राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं, त्या गर्भवती राहिल्याचे कोणतेच लक्षण दिसले नाही. यानुसार, शारीरिक संबंधानंतर बेडवर तसेच पडून राहिल्याने महिला गर्भवती होऊ शकते, हा समज निराधार ठरतो.
या निष्कर्षावर प्रतिक्रिया देताना शफील्ड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ऐलन पीसी म्हणाले की, त्यांना या तथ्यांवर काहीच आश्चर्य नाहीये. कारण वीर्य पेशींना गर्भाशयापर्यंत पोहोचण्यास केवळ पाच मिनिटांचा वेळ लागतो. त्यानंतर हे शुक्राणू गर्भाशयात अनेक दिवस जिवंत राहू शकतात. शारीरिक संबंधानंतर श्वास सामान्य होणे आणि लघवीसाठी बेडवरून उठेपर्यंत स्पर्म अंडाशयाला फर्टिलाइज करण्यासाठी पोहोचतो'.
यॉर्कशर हॉस्पिटलमध्ये रीप्रॉडक्टिव मेडिसिन अॅन्ड सर्जरीचे प्राध्यापक डॉ. ऐडम बालेन म्हणाले की, 'शारीरिक संबंधानंतर हवं ते करा, पण धुम्रपान करू नका'. अॅम्सटर्डॅम यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार एक वेगळी बाब समोर आली होती. इथे ४७९ महिलांवर कृत्रिम वीर्यरोपणाचा प्रयोग करण्यात आला होता. यात ज्या महिलांना १५ मिनिटांपर्यंत बेडवर आराम करण्यास सांगण्यात आला. त्यांची प्रेग्नंसी रेटींग ३२.२ टक्के होती, तर ज्या महिला आराम करण्यासाठी बेडवर नव्हता. त्यांची प्रेग्नसी रेटींग ४०.३ टक्के होती. या अभ्यासाचे मुख्य अभ्यासक जोक्यो वेन रिज्स्विज्क म्हणाले की, शारीरिक संबंधानंतर बेडवर तसेच झोपून राहिल्याने प्रेग्नंसी रेटवर कोणताही फरक पडत नाही.