बदललेली लाइफस्टाइल आणि चुकीच्या आहार सवयींमुळे केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर लैंगिक क्षमतेवरही परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, मेट्रो सीटीजमध्ये चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी झाली आहे. एका दुसऱ्या अभ्यासानुसार, सतत शारीरिक संबंध ठेवल्यानेही पुरुषांची प्रजनन क्षमता प्रभावित होते, असे सांगण्यात आले आहे.
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबाबत एक नवा रिसर्च समोर आला आहे. ब्रिटनच्या इस्ट एंग्लिया विश्वविद्यालयातील अभ्यासकांनुसार, पाणी आणि हवेतील बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर वाईट प्रभाव तर पडतोच सोबतच पुरुषांच्या प्रजनन क्षमतेलाही याचा धोका होऊ शकतो.
नेचर कम्युनिकेशन या मॅगझिनमध्ये प्रकाशित रिपोर्टचे मुख्य अभ्यासक मॅच गेज म्हणाले की, 'या अभ्यासातून आम्हाला आढळले की गरमीच्या दिवसात शुक्राणूंची क्रिया फारच संवेदनशील होते. अभ्यासकांना आढळले की, गरम हवेमुळे नराच्या शुक्राणूंची संख्या अर्धी होते आणि तसेच राहिलेल्या शुक्राणूंची प्रजनन क्षमता जवळपास नष्ट होते. दुसरीकडे मादांवर गरम हवेचा काहीही परिणाम होत नाही.
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काय?
1) स्वत:ला थंड ठेवा
शुक्राणू थंड वातावरणात चांगल्याप्रकारे विकसीत होतात. जे पुरुष लॅपटॉप मांडीवर घेऊन बसतात त्यांच्या प्रजनन क्षमतेचा स्तर घटतो. पुरुषांनी फार जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत राहू नये. या अभ्यासातून हे समोर आलं की, थंड पाण्याने आंघोळ केल्यास शुक्राणूंची निर्मिती ५ पटीने वाढते.
२) सूर्य प्रकाश
सूर्याच्या प्रकाशातून स्त्री आणि पुरुष दोघांनाही व्हिटॅमिन डी मिळतात. याने प्रजनन क्षमता वाढते. काही अभ्यासातून हे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डी महिलांमधील सेक्स हार्मोन्स प्रोजेस्ट्रोन आणि एस्ट्रोजनचा स्तर वाढवतात. याने मासिक पाळी नियमीत होते आणि गर्भधारणेचीही शक्यता वाढते.
३) अॅंटी-ऑक्सिडेंटने भरपूर पदार्थ
अँटी-ऑक्सिडेंट असलेले पदार्थ खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढते. त्यामुळे अॅंटी-ऑक्सिडेंट असलेले पदार्थ खावे. अॅंटी-ऑक्सिडेंट सर्वात जास्त हिरव्या भाज्या, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि संत्री यात आढळतात.
४) व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ
व्हिटॅमिन डी हाडांसाठी फार गरजेचं असतं. कारण याने हाडांना मजबूती मिळते, सोबतच पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्याही वाढते. व्हिटॅमिन डी अंडी, डेअरी उत्पादने, मांसाहार यातून प्रामुख्याने मिळतात. तसेच दूध, दही, बटर, पनीर यातूनही व्हिटॅमिन डी भरपूर मिळतात.
५) गाजर
पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गाजर फार फायदेशीर मानले जातात. हॉर्वर्ड यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांना शोधात आढळलं की, गाजरामध्ये आढळणारे तत्व पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. शोधानुसार, गाजरामध्ये केरोटीन नावाचं रसायन असतं, जे शुक्राणूंची संख्या तर वाढवतोच सोबतच त्यांची गुणवत्ताही सुधारतो.