संशोधकांनी ऐनोवेरा नावाची एक प्रभावी गर्भनिरोधक व्हजायनल रिंग विकसित केली आहे. त्यांच्यानुसार ही रिंग सहजपणे व्हजायनामध्ये स्वत: इन्सर्ट करू शकतात आणि गर्भधारणा टाळू शकतात. या रिंगचा वापर पूर्ण १ वर्ष केला जाऊ शकतो. या रिंगबाबत संपूर्ण माहिती इन्डोक्राइन सोसायटीच्या वार्षिक मीटिंगमध्ये सांगण्यात आली आहे.
२१ दिवस ठेवून ७ दिवसांसाठी काढली जाऊ शकते
ही गर्भनिरोधक रिंग व्हजायनामध्ये २१ दिवसांसाठी लावली जाऊ शकते आणि दर महिन्यात मासिक पाळी सुरू होताच ७ दिवसांसाठी काढली जाऊ शकते. ही एक रिंग तुम्ही १ वर्ष वापरू शकता. ही रिंग गर्भनिरोधक म्हणूण वापरलं जाणारं औषध सेजेस्टेरॉन एसिटेटची १५० एमसीजी आणि प्रेग्नेन्सी थांबवण्यासाठी वापरलं जाणारं औषध एथिनायल एस्ट्राडिओलची १३ एमसीजी रिलीज करू शकते.
१०० पैकी केवळ ३ महिलांना गर्भधारणा होण्याचा धोका
ही रिंग ज्या रेटने औषध रिलीज करते त्यानुसार १ वर्षात १०० महिलांपैकी केवळ ३ महिलांना नको असलेली गर्भधारणा होण्याची शक्यता असते. सेजेस्टेरॉन एसिटेट एक नवीन प्रोजेस्टिन आहे, जे प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्सना बांधून ठेवतं.
९७ टक्के प्रभावी रिंग
याआधी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार आणि रिसर्चमधून समोर आलेल्या क्लिनिकल ट्रायल डेटाचं विश्लेषण करून अभ्यासकांना हे आढळलं की, एखाद्या महिलेच्या रक्तात सेजेस्टेरॉन किती वेळासाठी राहतं आणि याचं प्रमाण किती असतं. सेजेस्टेरॉन एसिटेट सीरम सुरूवातीच्या ट्रायलमध्ये ऑव्यूलेशन रोखण्यास यशस्वी ठरलं. या गर्भनिरोधक रिंगचा सक्सेस रेट ९७ टक्के आहे आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधकांच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. कारण बाजारातील इतर गर्भनिरोधक केवळ ९५ टक्के प्रभावी आहेत, असं सांगण्यात आलं.