नको असलेल्या गर्भधारणेच्या भीतीमुळे अनेकजण लैंगिक जीवनाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाही. बरं यावर उपाय म्हणून महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमही आहेत. तर पुरुषांसाठी केवळ कंडोम. पण अनेकजण कंडोमचा वापर करुन आनंद मिळत नसल्याची तक्रार करत असतात. तसेच काही दिवसांपूर्वी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक जेल शोधल्याचा दावा एका कंपनीने केला होता. पण त्याबाबत अजूनही पूर्णपणे काही स्पष्टता नाही. अशात पुरुषांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता नको असलेल्या गर्भधारणेवर उपाय म्हणून एक बटन येणार आहे. याने बटनाच्या मदतीने लैंगिक क्रियेवर नियंत्रण मिळवून शारीरिक संबंधाचा भरपूर आनंद घेता येईल.
कंडोमला पर्याय
अनेक पुरुषांचं असं म्हणणं असतं की, कंडोमच्या वापरामुळे शारीरिक संबंधात आनंद मिळत नाही. अशावेळी गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करणे एक नाइलाज वाटतो. पण आता या समस्येचं समाधान लवकरच मिळणार आहे. शारीरिक संबंध ठेवताना जर नको असलेल्या गर्भधारणेची चिंता सतावत असेल तर महिलांकडे अनेक उपाय आहेत. मात्र पुरुषांकडे एकच उपाय आहे तो म्हणजे कंडोम.
काय आहे रिसर्च?
एका रिपोर्टनुसार, लवकरच पुरुषांसाठी बाजारात एक नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होईल. या टेक्निकच्या माध्यमातून पुरुषांच्या शरीरात एक स्विच लावला जाईल, ज्याद्वारे शुक्राणूंना ऑन किंवा ऑफ केले जाऊ शकेल. या स्विचच्या माध्यमातून शुक्राणूंची नलिका ब्लॉक करणे आणि ओपन करणे हे काम केले जाईल.
या टेक्नॉलॉजीच्या मदतीने नको असलेल्या गर्भधारणेची भीती असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. कारण ते याचा वापर करुन कोणत्याही दडपणाशिवाय लैंगिक क्रियेचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. या बटनाच्या मदतीने शुक्राणूंचा प्रवाह रोखला जाईल, ज्यामुळे गर्भधारणेची चिंता राहणार नाही.