पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणं हा अनुभव रोमांचक असण्यासोबतच तुमच्यासाठी भीतीदायकही होऊ शकतो. खासकरुन पुरुषांसाठी. कारण त्यांना चांगलं 'परफॉर्म' करायचं असतं. ही बाब फार सामान्य आहे. अनेकदा तुम्हीही हे कधी ऐकलं असेल की, पुरुष पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना फार जास्त वेळ परफॉर्म करु शकत नाहीत. याचं नेमकं काय कारण असू शकतं, हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
शीघ्रपतन - काही लोकांसाठी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणे फार तणावपूर्ण असतं. अशात त्यांचं प्रणयावर लक्ष केंद्रीत होत नाही. त्यामुळे त्यांना शीघ्रपतनाचा सामना करावा लागू शकतो. याला प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशन असं म्हणतात. ही समस्या जास्तीत जास्त पुरुषांमध्ये बघायला मिळते. अशात अनेक पुरुष वेगवेगळ्या शंका मनात आणत घाबरतात. पण पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना असं होणे सामान्य बाब आहे. त्यामुळे या गोष्टीला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. जसजसं तुमचं वैवाहिक आणि लैंगिक जीवन फुलत जाणार तुम्हाला याची सवय होईल, ही समस्या दूर होईल.
इरेक्टाइल डिस्फंक्शन - दुसरी सर्वात सामान्य समस्या असते ती कमजोर इरेक्शन. जास्तीत जास्त वेळा ही समस्या मानसिक दबावामुळे निर्माण होते. पण याबाबत तुम्ही जास्त विचार करु नये किंवा याचं टेन्शन घेऊ नये. ही समस्या आपोआप दूर होईल. ही समस्या जास्तच भेडसावत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण असं होणं डायबिटीज किंवा हृदयरोगाशी संबंधित रोगाचीही लक्षणे असू शकतात.
या गोष्टींची घ्या काळजी
अनेकदा काही लोकांसाठी शारीरिक संबंध हा स्वाभिमान किंवा अंहकाराचा मुद्दा ठरतात. पुरुषांना नेहमी याची चिंता लागलेली असते की, त्यांना योग्यप्रकारे लैंगिक क्रिया करायची आहे. आणि जोडीदाराला कसं खूश करायचं आहे. मात्र पहिल्यांदाच पुरुषत्व सिद्ध करण्याच्या फंद्यात न पडता तो वेळ एन्जॉय करा. हेही लक्षात ठेवा की, पॉर्न सिनेमात जे दाखवलं जातं ते सगळं खरं नसतं.
पहिल्यांदा जोडीदाराचं लाजणं, तिच्या असण्यावर आणि तिच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष केंद्रीत करा. यानेच तुम्हाला चांगला अनुभव येईल. अनेकदा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. तसेच तुमच्या जोडीदारासाठीही त्रासदायक ठरु शकतं. पुरुषांच्या गुप्तांगालाही इजा होऊ शकते. सामान्यपणे ५ पैकी एका महिलेला पहिल्यांदा शारीरिक संबंधादरम्यान वेदना होतात. याचं मुख्य कारण लुब्रिबेकश म्हणजेच गुप्तांगात ओलावा कमी असणे हे आहे. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लुब्रिकेशन प्रॉडक्टचा वापर करु शकता.