वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाची महत्वाची भूमिका असते. पती-पत्नीचं नात अधिक घट्ट होण्यासाठी आणि दोघांमधील प्रेम वाढण्यासाठी शारीरिक संबंध महत्वाचा असतो. पण अनेकदा काही कारणांमुळे महिलांना सेक्शुअल लाइफमध्ये संतुष्टी मिळत नाही. पण याबाबत मोकळेपणाने बोलण्यास त्या घाबरतात. त्यांना त्यावर काहीच बोलता येत नसल्याने त्यांची मनातल्या मनात घुसमट होते. असेच काही इतरही कारणे आहेत.
जिव्हाळा कमी असणे
एक्सपर्ट सांगतात की, जर पुरूष जोडीदाराला महिलेवरील प्रेम, स्नेह आणि सन्मान यांची जाणीव झाली नाही तर महिलांचाही पुरूष जोडीदाराबाबतचा जिव्हाळा कमी होऊ लागतो. अशा स्थितीत त्या फिजिकल इंटीमसीबाबत विचारही करू शकत नाहीत. जर त्या इन्वॉल्व झाल्या तरी त्या शारीरिक संबंध अजिबात एन्जॉय करू शकणार नाही. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..)
सतत बिझी शेड्युल
जास्तीत जास्त महिलांना बाहेरील कामांसोबतच घरातीलही सगळीच कामे करावी लागते. त्यांना घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. याचा त्यांच्यावर मानसिक ताण तर येतोच सोबतच शारीरिक ताणही येतो. असं झाल्यावर सतत थकवा आणि स्ट्रेस जाणवतो. अशा स्थितीत त्यांचं इंटीमेट होणं कठिण असतं.
बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्स
सेक्स लाइफ बोरिंग होणं किंवा इंटीमसीमध्ये प्रेम किंवा इमोशन नसणंही महिलांना पार्टनरपासून दूर करतं. तुम्ही जर पार्टनरसोबत केवळ फिजिकल इंटीमसीसाठी इन्वॉल्व होत असाल तर त्यांना याचा अजिबात आनंद मिळणार नाही. असं केल्याने महिला इमोशनली आणि फिजिकली इंटिमसीपासून दूरावा ठेवतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....)
आकर्षण न वाटणे
महिला आपल्या लूकबाबत फार संवेदनशील असतात. वाढलेलं वजन किंवा पार्टनरला आकर्षण किंवा प्रेम न वाटणं याने त्यांचा त्यांच्या शरीराबाबतचा कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो. असं झाल्यावर सेक्शुअल अक्टिविटीदरम्यान अजिबात सहजता वाटणार नाही. त्यांच्यासाठी सेक्शुअल अनुभव वाईट ठरेल.
सेक्शुअल फ्रस्ट्रेशन
जास्तीत जास्त महिला पार्टनरला हे सांगण्यात सहज नसतात की, शारीरिक संबंधावेळी त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना नेमकं काय आवडतं. ही बाब त्यांच्या प्लेजर आणि ऑर्गॅज्म फील करण्याच्या आडवी येते. हेच त्यांचं फ्रस्ट्रेशनचं कारण बनतं.