अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खावेत असं सांगितलं जातं. त्याशिवायही आणखी काही उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरले जातात. पण कधी तुम्ही शारीरिक संबंध आणि स्मरणशक्ती यांचा संबंध काय? याबाबत काही ऐकलं का? कदाचित अनेकांना हे माहीत नसेल. एका रिसर्चमधून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शारीरिक संबंध हा सर्वात चांगला उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कॅनडातील महिलांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शारीरिक संबंधाला सर्वात सोपा उपाय म्हटला गेलं आहे. कॅनडातील मॉन्ट्रिअल येथील यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी त्यांच्या एका रिसर्चमध्ये सांगितले की, नियमितपणे शारीरिक संबंध ठेवल्यास स्मरणशक्ती वाढते.
मॅकगिल यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांच्या रिसर्चनुसार, नियमीतपणे पीव्हीआय(पीनाइल-व्हजायनल इंटरकोर्स) म्हणजेच पुरुष पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वीच तरुण महिलांची स्मरणशक्ती चांगली असते. नंतर त्यांच्या मेमरी फंक्शनवर शारीरिक संबंधाचा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांची गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक चांगली होते.
काय सांगतो शोध?
आर्काइव्ह ऑफ सेक्शुअल बिहेविअर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितले की, त्यांनी या रिसर्चसाठी १८ ते २९ वयोगटातील ७८ हेट्रोसेक्शुअल महिलांची निवड केली होती. त्यांनी या तरुणींना एक कॉम्प्युटराइज्ड मेमरी टेस्ट पूर्ण करण्यास सांगितली होती. यात काही काल्पनिक शब्द आणि अनोळखी चेहरे होते. तरुणींकडून करुन घेण्यात आलेल्या या टेस्टमधून असे आढळले की, नियमीत रुपाने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या सहभागी तरुणींनी काल्पनिक शब्द चांगल्याप्रकारे लक्षात ठेवले होते.
तर अनोखळी चेहरे लक्षात ठेवण्यात त्यांना फारसं यश आलं नाही. यावरुन अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला की, ज्या महिला नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात, त्यांची वस्तू आणि शब्द लक्षात ठेवण्याची क्षमता, शारीरिक संबंधापासून अंतर ठेवणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक चांगली असते. त्यामुळे जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे, तर आहाराची मदत घेण्यासोबतच तुम्ही शारीरिक संबंधाचा आधार घेऊ शकता.