लग्नाच्या काही वर्षांनंतर अनेकांचा शारीरिक संबंधातील उत्साह कमी होतो ही एक सामान्य बाब आहे. पण हाच हरवलेला उत्साह परत मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न न करणे चुकीचे आहे. म्हणजे शारीरिक संबंधाची इच्छा तर असते पण त्यात काही नाविण्य नसल्याने टाळाटाळ केली जाते किंवा गरज म्हणून ती क्रिया केली जाते. ज्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झालेली असतात त्यांच्याकडून अशाप्रकारच्या तक्रारी फार ऐकायला मिळतात. पण शारीरिक संबंध ही गोष्टी अशी नाहीये, जी वेळेनुसार कंटाळवाणी व्हावी किंवा होऊ द्यावी. ज्यांना ही समस्या सतावत असेल त्यांच्यासाठी काही तज्ज्ञांच्या टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या कंटाळवाण्या लैंगिक जीवनात नवा उत्साह भरला जाईल.
1) वातावरण निर्मिती - अनेक वर्षांपासून सतत त्याच त्याच गोष्टी करत गेल्याने अनेकांचा लैंगिक क्रियेतील उत्साह कमी होतो. पण वेगळं काही म्हणून जर कॅंडल लावून किंवा हळुवार संगीत लावून शारीरिक संबंध ठेवले जर एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. याने तुम्ही घालवलेला उत्साह परत येईल आणि तुमच्या जोडीदारालाही यात आनंद मिळेल.
2) प्रेमाची जाणीव करुन द्या - तुमचं लैंगिक जीवन हे तुमचं बेडरुम बाहेर नातं कसं आहे, यावरही अवलंबून असतं. जोडीदारांमध्ये प्रेम असेल तर दोघेही चांगलं लैंगिक जीवन अनुभवू शकतात. त्यासाठी दोघांनीही एकमेकांना प्रेमाची जाणीव करुन द्यावी.
3) नव्यात अवघडलेपणा का? - जर तुम्ही वर्षातले २०० दिवस शारीरिक संबंध ठेवत असाल आणि दररोज नवी आसने करत असाल तर विचार करा तुमचं लैंगिक जीवन किती वेगळं असेल. याचा अर्थ हा आहे की, सतत एकच एक प्रकार न अवलंबता वेगवेगळी आसने केलीत तर यातून उत्साह वाढेल आणि दोघांनाही परमोच्च आनंद मिळेल. तुम्हाला यात कंटाळवाणं काही वाटणार नाही.
4) प्रयत्न सोडू नका - जर तुम्ही जोडीदाराला हवा तो आनंद देऊ शकत असाल तर जोडीदारही पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेईल. पण अशावेळी तुम्ही केवळ स्वत:ला मिळणाऱ्या आनंदाचा विचार करुन चालणार नाही. जोडीदारालाही परमोच्च सुख मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे.