शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ठराविक अशी वेळ नसते. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता. हे तुमच्या भावना आणि इच्छेवर अवलंबून असतं. पण उन्हाळ्यात शारीरिक संबंध ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या गोष्टींची काळजी घेतली नाही तर समस्या होऊ शकतात.
कंडोम कारमध्ये ठेवू नका
शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर महत्त्वाचा असतो, याने वेगवेगळ्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. त्यामुळेच कंडोमचा वापर करताना हे तपासून घ्या की, कंडोम व्यवस्थित आहे की नाही. उकाड्याच्या दिवसात कंडोम कारमध्ये चुकूनही ठेवू नका. कारण कारमधील तापमान फार जास्त असतं आणि यामुळे कंडोम खराब होऊ शकतो.
बाहेर प्रयोग नको
गरमीच्या दिवसात घराबाहेर, लॉनमध्ये, बाल्कनीमध्ये शारीरिक संबंध ठेवू नका. कारण गरमीच्या दिवसात वातावरणात अनेक कीटक, जीवजंतू असतात. ते चावल्यास खाज, खरुज, रॅशेज आणि त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे रुममध्येच शारीरिक संबंध ठेवा.
पाण्यात नको
अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात थंड पाण्यात डुबकी घेणे, आंघोळ करणे एक चांगला पर्याय आहे. अशात जर पार्टनर सोबत असेल तर वेगळे विचारही मनात येतात. पण गरमीच्या दिवसात स्वीमिंग पूलमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने एसटीडीजचा धोका असतो. स्वीमिंग पूलमध्ये असलेल्या क्लोरीनने कंडोमही खराब होऊ शकतो.
घामही महत्त्वाचा
शरीराला घाम येणे सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना घाम येत असेल तर अजिबात घाबरु नका. कारण हलक्यामुळे आपला मेंदू शांत राहतो आणि शरीराला सुद्धा आराम मिळतो. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना एसी बंद ठेवला तरी चालणार आहे. अशात घामाची एक वेगळीच मजा असते.
हायड्रेट रहा
शारीरिक संबंध ठेवणे व्यायामापेक्षा कमी नाहीये. शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीच्या शरीराची ऊर्जा खर्ची होते. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. झोपताना जवळ बॉटल ठेवा जेणेकरुन तहान लागेल तेव्हा पाणी पिऊ शकाल.
घाई करु नका
गरमीच्या दिवसात शारीरिक संबंध ठेवताना अजिबात घाई करु नका. याचा पूर्ण आनंद घेण्याचा प्रयत्न करा. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी हे क्षण आरामात घालवा आणि घाई करु नका.
अल्कोहोल सेवन नको
वातावरण कसंही असो अल्कोहोल सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारकच आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात अल्कोहोल सेवन करुन शारीरिक संबंध ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. कारण या दिवसात अल्कोहोलमुळे शरीराचं तापमान वाढतं आणि याने तुम्हाला परमोच्च आनंद मिळू शकणार नाही.