आरोग्यासाठी लवंग किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच दाताचं दुखणं आणि श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठीही लवंग फायदेशीर ठरते. पण लवंगाची आणखी एक खासियत म्हणजे याचा पुरूषांच्या लैंगिक जीवनासंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ कसा होतो लवंगाचा फायदा...
लवंग टेस्टला तिखट असते आणि लवंगाचा गुणधर्ण हा गरम असतो. लवंग खाल्ल्याने आपल्या व्हिटॅमिन बी चे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि पोषणही मिळतं. जसे की, विटमिन-B1,B2,B4,B6,B9 आणि व्हिटमिन-सी तसेच बीटा कॅरोटीन सारखे तत्व मिळतात. त्यासोबतच व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स सारखे तत्वही लवंगातून मिळतात.
लवंग नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करते. तसेच शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरायच्या असतील तर लवंग खावी. तसेच पोट फुगण्यासारखी समस्या होत असेल तर लवंग खाण्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.
पुरूषांची शक्ती वाढवते
तज्ज्ञांचं असं मत आहे की, लवंग खाल्ल्याने पुरूषांमधील पुरूषार्थासंबंधी समस्या दूर होतात आणि तुम्हाला शक्ती मिळते. तसेच लवंगाचं नियमाने आणि नियमित सेवन केल्यास शीघ्रपतनासारखी गंभीर समस्याही दूर होऊ शकते. याने तुमचं लैंगिक जीवन आनंदी राहणार आणि नात्यांची जवळीकताही टिकून राहणार.
स्पर्म काउंट वाढण्यास मदत
लवंगाचं सेवन केल्याने पुरूषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत मिळते. पण जर जास्त प्रमाणात सेवन कराल तर मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन असंतुलन होऊ शकतं. त्यामुळे लवंगाचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावं.
दोघांनाही होईल फायदा
लवंगाचा फायदा केवळ पुरूषांना होतो असं नाही तर यातील खास तत्वांमुळे महिलांमध्ये कामेच्छा वाढण्यासही मदत मिळते. यासाठी वेगवेगळ्या पदार्थामध्ये लवंगाचं प्रमाण योग्य तेवढंच केलं पाहिजे.