(Image Credit : mamamia.com.au)
प्रत्येक स्वप्नाला एक अर्थ असतो आणि अर्थाशिवाय स्वप्न येत नाही, असं बोललं जातं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शारीरिक संबंधाबाबत स्वप्न येत असतील तर याला केवळ स्वप्न समजू नका. कारण या स्वप्नांचा संबंध तुमच्या व्यक्तिमत्वाच्या एखाद्या रूपाशी जुळलेला असतो. जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये जसे की, एक्स गर्लफ्रेन्ड/बॉयफ्रेन्ड, बॉस किंवा अशी एखादी व्यक्ती जी तुम्हाला खूप आवडते किंवा अशी व्यक्ती जी तुम्हाला आवडते, त्या व्यक्ती विषयी शारीरिक संबंधाचे स्वप्न येत असतील तर याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊ शारीरिक संबंधाबाबत स्वप्न येण्याच्या अर्थ...
'सायकॉलॉजीकल टुडे' मधील एका लेखानुसार, जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघता आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला शारीरिक संबंधाची स्वप्ने येत असतील तर हे तुमच्यासाठी तुमची कामेच्छा जाणून घेण्यासाठी चांगलं आहे. याचा अर्थ हा होतो की, तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगू पाहत आहे की, तुमची शारीरिक गरज भागत नाहीये. मुळात सेक्शुअल एक्सपिरिअन्स आणि सेक्शुअल ड्रीम यात फरक असतो. अशाप्रकारची स्वप्ने आपल्यासाठी मेंदूचा संकेत असतात जे सांगतात की, आपल्याला शारीरिक संबंधाची गरज वाटत आहे.
तुम्हाला कुणासोबतही शारीरिक संबंधाबाबत स्वप्ने येऊ शकतात. कारण अनेकदा त्यांचा संबंध आपल्या डोक्यात सुरू असलेल्या आवेगाशी असतो. पण जर नेहमी तुम्हाला अशी स्वप्ने येत असतील तर त्यांचा काहीना काही अर्थ नक्की असतो. जास्तीत जास्त शारीरिक संबंधाची स्वप्ने ही आपल्या फॅंटसीशी निगडीत असतात. म्हणजे जर आपल्या कुणाबाबत आकर्षण वाटत असेल आणि त्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशी स्वप्ने येऊ शकतात.
अनेकदा अशा स्वप्नांचे दुसरे अर्थही निघतात. जर तुमचं रिलेशनशिप संपलं असेल आणि तरी तुम्हाला एक्स पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची स्वप्ने येत असतील तर हे समजा की, तुम्ही अजूनही एक्सच्या जवळ आहात. म्हणजे अजूनही तुमच्या मनात तुमच्या एक्सबाबत प्रेम आणि संवेदना आहे.
त्यासोबतच याचा अर्थ असाही असू शकतो की, एखाद्या व्यक्तीच्या जुन्या आठवणी अजूनही शिल्लक आहेत आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अशी स्वप्ने येत राहतात. सायकॉलॉजिकल टुडे वेबसाइटने शारीरिक संबंध आणि स्वप्ने याबाबत एका रिपोर्टमध्ये हे सांगितलं आहे.