शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : एक्सपायर्ड कंडोमचा वापर ठरू शकतो घातक, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:13 IST

Sexual Health : अनेकजण कंडोम(Condom) वापरतात पण अनेकांना हे माहीत नसतं किंवा लक्ष देत नाही की कंडोमचीही एक्सपायरी डेट असते. म्हणजे एका कालावधीनंतर कंडोम वापरता येत नाही.

Sexual Health : कंडोमचा वापर लोक दोन कारणांसाठी करतात. एकतर अनेकजण याचा वापर गर्भधारणा टाळण्यासाठी करतात. तर काही लोक याचा वापर यौन संक्रमणापासून बचाव करण्यासाठीही कंडोमचा (Expired Condom) वापर करतात. कंडोम वापरण्याची ही दोन मुख्य कारणे आहे. कंडोम लेटेक्स रबरपासून तयार केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कंडोमची सुद्धा एक्सपायरी डेट असते. 

कंडोमची एक्सपायरी डेट

अनेकजण कंडोम वापरतात पण अनेकांना हे माहीत नसतं किंवा लक्ष देत नाही की कंडोमचीही एक्सपायरी डेट असते. म्हणजे एका कालावधीनंतर कंडोम वापरता येत नाही. लोक आजही कंडोमबाबत मोकळेपणाने बोलत नाही. म्हणून याचीही कधीही चर्चा होत नाही. त्यामुळे कधीही कंडोम घेताना हे बघा की, ते एक्सपायर्ड तर नाही ना. प्रत्येक कंपनीची एक्सपायरी डेट वेगवेगळी असते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...)

कधीपर्यंत केला जाऊ शकतो वापर

एक्सपायरी डेटशिवाय कंडोम बनत नाहीत. पण हेही खरं  आहे की, काही कंडोम ३-४ वर्षही चालतात. मात्र, कंडोमा वापर करण्याआधी त्याची एक्सपायरी डेट नक्की बघा. सोबतच हेही बघा की, कंडोममध्ये लुब्रिकेशन आहे की नाही. तसेच कंडोम फार जास्त उष्ण ठिकाणी ठेवू नये.

कंडोमची एक्सपायरी डेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. अनेक लोकांना हा गैरसमज असतो की, कंडोम कितीही दिवस सांभाळून ठेवले तर ते खराब होत नाही. पण असं नसतं. कोणतीही वस्तू ही एक्सपायरी डेटसोबत येत असते. वस्तू तशा टेस्ट करूनच मार्केटमध्ये येत असतात.  (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?)

इन्फेक्शनचा धोका

एक्सपायरी डेट जाणून घेणं यासाठीही गरजेचं आहे कारण जर तुम्ही एक्सपायर्ड कंडोमचा वापर केला तर याने संक्रमण होण्याचा धोका वाढतो. तुम्हाला प्रायव्हेट पार्टसंबंधीही काही समस्या होऊ शकतात. प्रायव्हेट पार्टमध्ये खाजेची समस्याही होऊ शकते. याने तुमच्या पार्टनरलाही समस्या होऊ शकते. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स