लैंगिक जीवन आजही अनेकांसाठी रहस्यच असतं. कारण वैवाहिक जीवनानंतर लैंगिक जीवनाचा अनुभव आल्यानंतरही अनेकजण वेगवेगळ्या चुकांमुळे लैंगिक जीवनाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाही. अनेकांना छोट्या तर अनेकांना गंभीर लैंगिक समस्या असतात. पण ते कुणाला सांगायला लाजतात किंवा त्यांना कमीपणा वाटतो. याने महिला आणि पुरूष दोघांचंही लैंगिक जीवन आनंदी राहत नाही.
हे कुणापासूनची लपलेलं नाही की, जवळपास सगळेच मनोरंजनासाठी आपल्या फॅंटसीज पूर्ण करण्यासाठी पॉर्न सिनेमे बघतात. पण अधिक प्रमाणात पॉर्न बघितल्याने अनेक लैंगिक समस्यांचा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे या समस्या इरेक्शनसंबंधी असू शकतात तर काहींना शीघ्रपतानाची असू शकते. काहींना तर अशीही समस्या असते की, पॉर्न बघताना त्यांना इरेक्शन(ताठरता) जाणवते, पण शारीरिक संबंधावेळी नाही. त्यामुळे सगळंच जागेवर बसतं.
या समस्येवर तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला पॉर्न बघताना किंवा हस्तमैथुन करताना इरेक्शन होत असेल, आणि पार्टनरसोबत शारीरिक संबंधावेळी होत नसेल तर ही मानसिक समस्या असल्याचे समजून घ्या. ही समस्या शारीरिक नाही. कोणत्याही स्थितीत जर प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेशासाठी आवश्यक मजबूती येत नसेल तर मग ही शारीरिक समस्या असू शकते.
या शारीरिक समस्येची वेगवेगळी कारणे असू शकतात. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती डायबिटीसने, बीपीने किंवा मानसिक समस्येने ग्रस्त असेल त्यासंबंधी औषधांचं सेवन करत असेल तर अशी समस्या होते. चांगलं हेच होईल की, या समस्येच्या मुळात जावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे. याबाबतीत उगाच वेळ न घालवता डॉक्टरांशी चर्चा करावी.