बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव हे पुरूषांमध्ये सेक्स हार्मोन कमी असण्याचं मुख्य कारण आहे. पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन सेक्सची इच्छा वाढवतात. सामान्यपणे वाढत्या वयात टेस्टोस्टेरॉनची कमतरता बघायला मिळते. पण अलिकडे ३० वयातही पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता बघायला मिळते.
व्यक्तीमधील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण त्याच्या सामाजिक व्यवहाराला प्रभावित करतं. त्यामुळे हे फारच गरजेचं आहे की, व्यक्तीने टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नेहमी योग्य ठेवावं. नाही तर पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लग्न झाल्यावर यामुळे लैंगिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात, तुमचं नातंही अडचणीत येऊ शकतं.
सेक्स हार्मोन वाढवण्याचे सोपे उपाय
अनेकदा आपल्या लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे सेक्शुअल लाइफमध्ये कमजोरी येऊ लागते. जर तुमच्यासोबतही असंच काही होत असेल तर काही उपाय वापरून तुम्ही तुमचं लैंगिक जीवन आनंदी ठेवू शकता.
१) दिवसाची सुरूवात हाय प्रोटीन आहाराने करावी. यासाठी ब्रेकफास्टमध्ये अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि नट्सचा समावेश करावा. कार्बोहायड्रेट्स असलेल्या ब्रेकफास्टने टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं.
२) पुरूषांच्या कंबरेवर जेवढी जास्त चरबी असेल तेवढं त्या व्यक्तीत टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असेल. त्यामुळे अॅब्सवर थोडं काम करणं गरजेचं आहे. अॅब्ससाठी काही एक्सरसाइज नियमित कराव्यात. एक्सरसाइजने शरीर मजबूत होतं आणि सेक्स पॉवरही वाढते.
३) झोपेचाही टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो. तुम्ही किती तासांची झोप घेता याचा प्रभाव तुमच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या निर्मितीवर पडतो. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की, रात्री कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. कारण शरीरात ७० टक्के टेस्टोस्टेरॉन झोपेतच शरीरात तयार होतात.
४) एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे पुरूष वेट लिफ्टिंग एक्सरसाइज करतात त्यांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोमध्ये ४९ टक्के वाढ होते. त्यामुळे एक्सरसाइजमध्ये मसल्सचे वर्कआउट करावेत.
५) पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कामय ठेवण्यासाठी झिंक आणि मॅग्नेशिअम असलेल्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं.
६) अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरूषांमध्ये सेक्स हार्मोनचं प्रमाण कमी होतं. एका रिसर्चनुसार, अल्कोहोलचं सेवन केल्याने शरीरात ५० टक्के कमी टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होते.
७) गोड कमी खावे कारण याने शुगरचं प्रमाण वाढून इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. जेव्हा तुम्ही गोड काही खाता तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं.