(Image Credit : dailydot.com)
लैंगिक जीवन एक असा विषय आहे ज्या लोक फारच कमी चर्चा करतात किंवा त्याबाबत कमी माहिती मिळवतात. पण या विषयावर जगभरात सतत वेगवेगळे रिसर्च सुरू असतात. रिसर्चसोबत अनेकजण ऑनलाईन सर्व्हेही करतात. या सर्व्हेंमधीलच लैंगिक जीवनाबाबतच्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- एका सर्व्हेमधून असं समोर आलं की, ६० टक्के पुरूषांना असं वाटतं की, शारीरिक संबंधासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.
- आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- शारीरिक संबंधावेळी हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या पुरूषांमध्ये ८५ टक्के असे पुरूष असतात, जे त्यांच्या पत्नीला दगा देत असतात.
- ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या असते त्यांच्यासाठी शारीरिक संबंधाशिवाय चांगला उपाय असूच शकत नाही. कारण शारीरिक संबंधानंतर रिलीज होणाऱ्या हार्मोन्समुळे चांगली झोप येते.
- प्रत्येक पुरूष दर सात सेकंदात कमीत कमी एकदा सेक्सबाबत विचार करतो.
- २० टक्के पुरूषांना ओरल सेक्सने आनंद मिळतो. तर ६ टक्के महिलांना हा केवळ फोरप्लेचा भाग वाटतो.
- लेटेक्स कंडोमचं लाइफ सरासरी २ वर्षे असतं.
- रोमॅंटिक पुस्तके वाचणाऱ्या महिला अशी पुस्तके न वाचणाऱ्या महिलांच्या तुलनेत लैंगिक जीवनाचा अधिक आनंद लुटतात.
- युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर्समधील अभ्यासकांनी केलेल्या एका रिसर्चनुसार, पुरूष कोणत्याही दुसऱ्या रंगाच्या तुलनेत लाल रंगाचे कपडे घातलेल्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
- नेहमीच असं बोललं जातं की, महिलांना उत्तेजित होण्यासाठी कमीत कमी २० मिनिटांचा वेळ लागतो. पण एका रिसर्चमधून समोर आलं की, एखाद्या पुरूषाची कल्पना करून किंवा फोरप्लेने उत्तेजित होण्यासाठी केवळ १० मिनिटांचा वेळ लागतो.
- पुरूष आणि महिला दोघेही एका दिवसात अनेकदा ऑर्गॅज्मचा अनुभव घेऊ शकतात.
- अनेकदा वीर्यातून ब्लीचसारखा गंध येऊ शकतो. याने काही नुकसान होत नाही.
– पुरूषांना रात्री झोपेत सरासरी ४ किंवा ५ वेळा इरेक्शनचा(ताठरता) चा अनुभव येतो.
- पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टच्या आकाराचा ऑर्गॅज्मशी काहीही संबंध नसतो. कारण महिलांच्या प्रायव्हेट पार्टमधील केवळ १/3 भागच संवेदनशील असतो. जर पोजिशन योग्य असेल तर लहान आकाराच्या प्रायव्हेट पार्टने देखील ऑर्गॅज्मचा अनुभव येतो.
- जर्मन अभ्यासकांनुसार, सुरक्षित रिलेशनशिपमधील महिलांची सेक्शुअल इच्छा कमी होते. ४ ते ५ वर्ष सोबत राहिल्यावर महिला पुरूषांच्या इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवतात.
- एका सर्व्हेनुसार, शारीरिक संबंधासाठी कपल्सची सर्वात आवडती जागा बेडरूम नाही तर कार ही असते.
- एका रिसर्चनुसार, निळ्या डोळ्यांचे पुरूष हे नेहमी निळ्या डोळ्यांच्या महिलांना पसंत करतात.
- महिला पीरियड्सदरम्यान किंवा त्याआधी जास्त आनंदादायी ऑर्गॅज्मचा अनुभव घेतात. कारण या दिवसात त्यांच्या पेल्विक एरियात म्हणजे ओटिपोटाजवळ रक्तप्रवाह वाढतो.
- शारीरिक संबंधावेळी पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक कल्पनाशील असतात. अशाप्रकारे सेक्शुअल फॅंटसीमध्ये त्यांना संतुष्टी मिळते.
- जे पुरूष जास्त सेक्शुअल फॅंटसीमध्ये राहतात, ते आपल्या रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये कमी संतुष्ट राहतात.
- अनेक पुरूषांमध्ये स्खलनानंतर म्हण प्रायव्हेट पार्टमध्ये इरेक्शन राहतं, ज्याने फार वेदना होतात. याला प्रीएटिसिज्म म्हणतात.
- सामान्यपणे असं मानलं जातं की, प्रेग्नेन्सी दरम्यान महिलांची शारीरिक संबंधाची इच्छा संपते. पण हे खरं नाही. गर्भावस्थेदरम्यान जास्तीत जास्त महिलांची शारीरिक संबंधाची इच्छा वाढते किंवा आधीसारखीच राहते.