हिवाळा सुरू झाला की, अनेक महिलांना व्हजायनल ड्रायनेसची समस्या होते. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी त्यांना त्रास होतो. अशात तज्ज्ञ शारीरिक संबंधावेळी ल्यूब्स म्हणजेच लुब्रिकंट्सचा वापर करण्याचा सल्ला देतात. पण काही असेही नैसर्गिक ल्यूब्स असेही आहेत जे घरातच उपलब्ध असतात. असंच नैसर्गिक ल्यूब खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकनट ऑइल आहे. चला जाणून घेऊ गुप्तांगाच्या संवेदनशील त्वचेसाठी हे तेल फायदेशीर आहे किंवा नाही.
खोबऱ्याचं तेल त्वचा, केस, वेट लॉस, कुकिंग ऑइल म्हणून आधीपासूनच वापरलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा लुब्रिकंट म्हणूनही वापर केला जाऊ शकतो? जास्तीत जास्त महिला असा विचार करतात की, मार्केटमध्ये मिळणारे लुब्रिकंट्स त्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे त्या ल्यूबचा वापर करणे टाळतात किंवा चुकीच्या गोष्टींचाही वापर करतात.
त्रास होतो कमी
अनेकांना हे माहीत नसतं की, लुब्रिकंटच्या वापराने इंटरकोर्स फार आरामदायक होतो. तरी सुद्धा तुम्हाला ल्यूब खरेदी करायचं नसेल तर तुम्ही कोकनट ऑइलचा वापर करु शकता. मुळात खोबऱ्याच्या तेलाने सेंसेशन वाढतं आणि त्यामुळे शारीरिक संबंध अधिक चांगल्याप्रकारे ठेवू शकाल. हे तेल मार्केटमध्ये मिळणाऱ्या लुब्रिकंटप्रमाणेच काम करतं. पण काय कोकनट ऑइल व्हजायनासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे? याने काही समस्या तर होणार नाही ना?
किती सुरक्षित आहे खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल हे नैसर्गिक असतं. यात कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. यासोबतच हे तेल स्वस्तही असतं. या तेलामध्ये नैसर्गिक अॅंटी-मायक्रॉबिअल आणि अॅंटी फंगल तत्व असतात. वॉटर आणि सिलिकॉन बेस्ड ल्यूब्सच्या तुलनेत हे तेल अधिक घट्ट आणि लॉन्ग लास्टिंग असतं. यात मॉइश्चराइज प्रॉपर्टीही असते.
कसा करावा वापर?
- खोबऱ्याचं तेल लेटेक्स कंडोमसोबत वापरु नका. कारण तेलामुळे लेटेक्स खराब होण्याचा धोका असतो. असं केल्याने तुम्ही गर्भवती होऊ शकता किंवा STD ची भीती असते. कंडोम फाटूही शकतो.
- लेटेक्स कंडोमसोबत केवळ वॉटर बेस्ड किंवा सिलिकॉन बेस्ड कंडोमचा वापर करावा.
- खोबऱ्याच्या तेलाचा वापर केवळ पॉलियूरेथेन कंडोमसोबतच करावा.
- जर तुम्हाला व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन झालं तर खोबऱ्याच्या तेलाचा वापर ल्यूब म्हणूण करु नका. याने व्हजायनाचं पीएच बिघडू शकते.
- हेही गरजेचं आहे की, रिफाइन्ड खोबऱ्याच्या तेलाऐवजी नॉन रिफाइन्ड तेलाचा वापर करावा. तसेच कोणताही उपाय हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात करु नका.
(टिप - वरील गोष्टी केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ला म्हणून बघू नका. तुम्हाला कोणताही समस्या असेल तर काहीही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)