सामान्यपणे तारूण्यात आल्यावर सेक्शुअल डिजायर डेव्हलप होऊ लागते. बॉडी क्लॉकमुळे ट्रिगर होणारी ही बाब आधी जिज्ञासेमुळे वाढू लागते. पण नंतर याची वेगवेगळी कारणे डेव्हलप होऊ लागतात. अनेकजण शारीरिक संबंध ठेवतात, पण का ठेवतात याचा विचार करत नाही. मात्र, शारीरिक संबंध ठेवण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असू शकतात.
प्लेजर आणि सॅटिस्फॅक्शन
शारीरिक संबंध ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्लेजर आणि सेक्शुअल डिजायर सॅटिस्फाय करणं हे आहे. यासाठी अनेकदा लोक कॅज्युअली सुद्धा शारीरिक संबंध ठेवतात.
मेल पॉवर
एका रिसर्चनुसार, काही पुरूष त्यांचा पुरूषार्थ सिद्ध करण्यासाठी आणि स्वत:ला इतर पुरूषांपेक्षा चांगलं सिद्ध करण्यासाठीही काही लोक शारीरिक संबंधाचा आधार घेतात. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये शारीरिक संबंधाबाबत अधिक चर्चा होते. ज्यामुळे त्यांच्यात हे सिद्ध करण्याची स्पर्धा असते की, ते त्यांच्या पार्टनरला किती संतुष्ट करतात किंवा जास्त आनंद देतात.
प्रेमासाठी
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध महत्वाची भूमिका बजावतो. कपल प्रेम व्यक्त करण्यासाठी फिजिकल इंटिमसी एन्जॉय करतात.
भावनिक गरज
अनेकदा कपल्स त्यांची भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी शारीरिक संबंधाचा आधार घेतात. पण ही बाब एका नात्यासाठी अजिबात हेल्दी नसते.
असुरक्षिततेची भावना
अनेकदा काही कपल्समध्ये शारीरिक संबंध असुरक्षेच्या भावनेमुळेही होतं. त्यांना ही भीती असते की, शारीरिक संबंध ठेवले नाही तर पार्टनर त्यांना दगा देईल. या कारणामुळेही काही कपल्स इच्छा नसूनही शारीरिक संबंध ठेवतात.
फॅमिली वाढवण्यासाठी
अनेक विवाहित कपल्समध्ये शारीरिक संबंधाचा मुख्य उद्देश परिवार वाढवणे हाच असतो. हेच कारण आहे की, अनेक कपल्स लग्नाच्या एका वर्षातच पालक होतात.
शारीरिक आकर्षण
अनेकदा शारीरिक आकर्षणही शारीरिक संबंधाचं कारण ठरतं. या स्थितीत जास्तीत जास्त वन नाइट स्टॅन्ड होतात. पण यात भावनिकता अजिबात नसते. असते ती केवळ शरीराची ओढ.