आपण सर्वांनीच आपल्या लाइफमध्ये कधी ना कधी कुठे वापरलेला कंडोम फेकलेला पाहिला असेल. हा कंडोम पाहून कधी लाजिरवाणं तर कधी चिड आली असेल. तर कधी असंही तुम्ही ऐकलं असेल की, लहान मुल बाहेरून कुठूनतरी कंडोम उचलून घेऊन आलं किंवा घरातील कंडोम समोर घेऊन आलं. जेव्हा ते विचारतात की, हे काय आहे? अशा स्थितीत विचित्र वाटतं. पण जर आपण योग्य ती काळजी घेतली तर अशी स्थितींचा सामना करावाच लागणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला कंडोम डिस्पोज करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
बायोडिग्रेडेबल नसतात कंडोम
कंडोम हे बायोडिग्रेडेबल नसतात म्हणजेच ते नैसर्गिक पद्धतीने स्वत:हून नष्ट होत नाहीत. त्यामुळे तर कंडोम व्यवस्थित डिस्पोज करण्याची जबाबदारी आणखी वाढते. तुम्हाला कंडोम डिस्पोज करण्याची योग्य पद्घत सांगण्याआधी आम्ही तुम्हाला लोक यासाठी वापरत असलेल्या चुकीच्या पद्धती सांगणार आहोत. या चुका तुम्ही वेळीच बंद करायला हव्यात.
कंडोम फ्लश अजिबात करू नका
जास्तीत जास्त लोक हे कंडोम वापरल्यावर टॉयलेटमध्ये फ्लश करतात. पण करणे पूर्णपणे चुकीचं आहे. फ्लश केले गेलेल्या कंडोममुळे टॉयलेटचं प्लम्बिंग जाम करतात. त्यामुळे पाणी व्यवस्थित पास होत नाही. अनेकदा टॉयलेटमध्ये फ्लश केले गेलेले कंडोम हे समुद्रात, नदीत किंवा नाल्यांमध्ये पोहोचतात. कारण शहरातील सांडपाणी याच ठिकाणी जातं. तसेच घरातली कंडोम कुठेही फेकण्याची चूक करू नका. तसेच अनेकजण आळशीपणा करून कंडोम कुठेही फेकतात. हेही टाळलं पाहिजे.
ही आहे डिस्पोजची योग्य पद्धत
कंडोम कुठेही असाच फेकण्यापेक्षा तुम्ही केवळ काही मिनिटांचा वेळ घेऊ योग्यप्रकारे डिस्पोज करू शकता. कंडोम टीशू पेपर, पेपर बॅग किंवा न्यूजपेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात फेका. पेपरमध्ये बांधतानाही याची काळजी घ्या की, पेपरची पुडी व्यवस्थित असेल जेणेकरून ती सुटू नये.
आणखी एक महत्त्वाचं
कंडोममधील सीमन(वीर्य) आणि दुर्गंधी पसरू नये म्हणून तुम्ही हवं तर कंडोमचं तोंड बंद करा. त्यानंतर कंडोम पेपरमध्ये व्यवस्थित सुटणार नाही अशा पद्धतीने गुंडाळा.