आजही शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे होतं काय की, लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज निर्माण होतात. म्हणजे मित्रांमध्ये लैंगिक जीवनावर केल्या जाणाऱ्या चर्चेचा ठोस आधार काही नसतो. त्यामुळे हे गरैसमज एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरतात. या गैरसमजामुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामनाही करावा लागतो. आज आम्ही अशाच काही गैरसमजाबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
१) पॉर्नमध्ये दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी...
लोकांमध्ये असलेला हा सर्वात मोठा गैरसमज आहे. पॉर्न मुव्ही हे सिनेमा आहेत त्यामुळे ते तयार करण्यासाठी अनेक गोष्टींची महत्वाची भूमिका असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी तयार केल्या जातात. हे मुव्ही शूट करताना त्यातील मॉडल्स वेगवेगळ्या औषधांचं सेवन करतात आणि अनेक क्रीम्सचा वापर करतात. नाही तर ते इतका वेळ टिकाव धरूच शकले नसते.
२) शारीरिक संबंधावेळी वेदना होतातच
हे खरं नाहीये. शारीरिक संबंध ठेवून दोघांचं शरीर रिलॅक्स होत असतं आणि शरीराला आराम मिळतो. पण पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना व्हजायनाच्या मसल्स खुलतात म्हणून काही वेदना होऊ शकतात, पण जास्त वेदना होणं ही एक सामान्य समस्या असू शकते. जर महिलांना शारीरिक संबंधावेळी वेदना होत असतील तर त्याला काही शारीरिक कारणे असू शकता. जसे की, व्हजायनामध्ये नैसर्गिक लुब्रिकंट्स नसणे, व्हजायनामध्ये मसल्स किंवा टिश्यूमध्ये इजा असणे किंवा संबंधावेळी काही चुकीमुळेही वेदना होऊ शकते.
३) प्रायव्हेट पार्टच्या साइजने फरत पडतो.
काही लोकांना वाटतं की, पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टची साइज त्यांच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकते. ही फारच चुकीची आणि भ्रामक माहिती आहे. प्रायव्हेट पार्टची साइज वेगवेगळी असू शकते. चांगल्या शारीरिक संबंधासाठी प्रायव्हेट पार्टची साइज नाही तर दोघांचं सहज असणं आणि आपल्या आवडींबाबत विचार करणं महत्वाचं आहे.
४) शारीरिक संबंधामुळे व्हजायनाचा आकार वाढतो
अनेकांना असं वाटतं की, शारीरिक संबंधामुळे व्हजायनाच्या मसल्स सैल होतात किंवा महिलांनी जास्त शारीरिक संबंध ठेवला तर त्यांच्या गुप्तांगाच्या मसल्स सैल होतात. पण असं अजिबात होत नसतं. उत्तेजनेमुळे प्रायव्हेट पार्टच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपॅंड होतात आणि जेव्हा एखादी महिला उत्तेजित होते तेव्हा सोप्या आणि सहज पेनिस्ट्रेशनसाठी त्यांच्या प्रायव्हेट पार्टची वॉल सॉफ्ट आणि फ्लेक्सिबल होते.
५) ऑर्गॅज्म मिळाल्यावरच शारीरिक संबंधाचा आनंद घेता येतो
शारीरिक संबंध ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. ही ऑर्गॅज्मसोबत आणि ऑर्गॅज्म विनाही होऊ शकते. ऑर्गॅज्म वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे प्रभावित होऊ शकतो. जर एखाद्या महिलेला किंवा पुरूषाला शारीरिक संबंधावेळी ऑर्गॅज्म मिळाला नाही तर त्यांच्या प्रक्रियेत काही चूक झाली असं होत नसतं. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.