आपण जे काही खातो त्यातील पोषक तत्व शरीरात ठेवून विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यासाठी लघवी येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, जर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवताना नेहमी लघवी आल्यासारखं जाणवत असेल तर यामागे काहीतरी कारण असू शकतं. हे तुमच्या पेल्विक मसल्स कमजोर असण्याचं कारणही असू शकतं. त्यासोबतच इतरही काही कारणांमुळे तुम्हाला शारीरिक संबंधावेळी लघवी येऊ शकते. चला जाणून घेऊ काय आहेत ही कारणे...
ड्रायनेस - व्हजायनल ड्रायनेस मेनोपॉजचं एक सामान्य लक्षण असतं. असं एस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यावर होतं. एस्ट्रोजन व्हजायना आणि यूरिनरी ट्रॅक्टमध्ये मॉइश्चर आणि लुब्रिकेशनला नियमित करण्यास मदत करतं. जेव्हा यूरिनरी ट्रॅक्ट ड्राय होतो, तेव्हा लघवी आल्यासारखं जाणवू शकतं. जर तुम्ही अशात लघवी करायला जात नसाल तर एस्ट्रोजन, मॉइश्चर या संवेदनशीलतेला कमी करतं.
वेदना आणि जळजळ - शारीरिक संबंधावेळी जर तुम्हाला वेदना किंवा जळजळ होत असेल तर हे व्हजायनल किंवा यूरिनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. त्याचप्रमाणे जर लघवी करतेवेळी पांढऱ्या किंवा ग्रे रंगाची होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचं आहे.
पोजीशन - काही पोजीशनदरम्यान तुमच्या ब्लॅडरवर दबाव पडू शकतो, ज्यामुळे तुम्हाला लघवी आल्यासारखं वाटू शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पोजीशन बदलू शकता.
नेहमी लघवी येणे - जर तुम्हाला नेहमीच असं वाटत असेल की, तुम्हाला लघवी येत आहे. आणि तुम्ही बाथरूमला गेल्यावर लघवी येतंच नसेल तर यामागे डायबिटीस किंवा तणावाचा कारण असू शकतं. पेल्विक मांसपेशी कमजोर झाल्याने ब्लॅडरवर दबाव पडतो आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येण्याची समस्या होऊ शकते.