महिला आणि पुरूषांच्या रिलेशनशिपबाबत सतत काहीना काही रिसर्च केले जातात. या रिसर्चमधून तुमच्या संबंधाच्या पद्धती, प्रकार या गोष्टी जाणून घेतल्या जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाबाबत महिलांच्या तुलनेत पुरूष अधिक पुढाकार घेतात. या रिसर्चमधून सांगण्यात आले आहे की, महिला आणि पुरूषांची शारीरिक संबंधाबाबतची वागणूक वेगवेगळी असते.
जनरल इवोल्यूशन बिहेविअर सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरूष शारीरिक संबंधाला तीन पटीने अधिक महत्व देतात. तर महिला शारीरिक संबंधाबाबत उशीरापर्यंत अंतरंग राहणं पसंत करतात, म्हणजे त्या अधिक पुढाकार घेत नाहीत. या रिसर्चमध्ये कपल्सच्या शारीरिक संबंधाना प्रभावित करणाऱ्या कारणांचा शोध घेण्यात आला.
या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी महिला आणि पुरूष यांच्या संबंधाचा खोलवर अभ्यास केला. त्यासाठी यात १९ ते ३० वयोगटातील ९२ जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता आणि त्यांच्यासोबत चर्चा केली गेली. त्यांना शारीरिक संबंधाबाबत प्रश्न विचारले गेले. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, रिलेशनशिप जेवढं जुनं होत जातं, शारीरिक संबंधाची इच्छा तेवढी कमी होत जाते.