(Image Credit : nypost.com)
अलिकडे लोकांना मोबाइल वापराची सवय किती आणि कशी लागलीय हे काही लपलेलं नाहीये. पण यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. सोबतच मोबाइलच्या अतिवापराने लोकांना लैंगिक जीवनासंबंधी समस्यांचाही सामना करावा लागत आहे. मोरक्कोतील कासाब्लांकामधये शेक खलीफा बेन जायद आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय हॉस्पिटलमधील लैंगिक आरोग्य विभागातील रिसर्चमध्ये ६० टक्के लोकांनी स्मार्टफोनमुळे त्यांच्या लैंगिक जीवनात समस्या आल्याचा स्वीकार केला आहे.
रात्री वापरतात फोन
(Image Credit : mattressadvisor.com)
मोरक्को वर्ल्ड न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांच्या रिसर्चचा हवाल्याने सांगितले की, रिसर्चमध्ये सहभागी सर्वच ६०० लोकांकडे स्मार्टफोन होता आणि यातील ९२ टक्के लोकांनी रात्री फोनचा वापर करत असल्याचं मान्य केलं. त्यातील केवळ १८ टक्के लोकांनी फोन बेडरूममध्ये फ्लाइट मोडवर ठेवत असल्याचं सांगितलं. रिसर्चमधून समोर आलं की, स्मार्टफोनने २० ते ४५ वयोगटातील वयस्कांवर नकारात्मक प्रभाव पडतोय. ज्यात ६० टक्के लोकांनी सांगितले की, फोनमुळे त्यांची सेक्शुअल पॉवर प्रभावित झाली आहे.
'कार्यक्रम' करतांनाही घेतात फोन
(Image Credit : nypost.com)
रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, जवळपास ५० टक्के लोकांनी सेक्स लाइफ चांगलं नसल्याचं सांगितल. कारण त्यांनी जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर केला. अमेरिकेतील श्योरकॉल कंपनीच्या एका सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे की, जवळपास तीन-चतुर्थांश लोकांनी मान्य केले की, ते रात्री बेडवर किंवा डोक्याच्या बाजूला फोन ठेवून झोपतात. तर एक तृतीयांश लोकांनी सांगितले की, इनकमिंग कॉलला उत्तर देण्याच्या नाइलाजाने त्यांना संबंध ठेवण्यासही अडचण येते.
स्पर्म काउंटही घटला
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, जे पुरूष आपला मोबाइल नियमितपणे पॅंटच्या खिशात ठेवतात, त्यांचा स्पर्म काउंट कमी होण्याचा धोका असतो. केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्येही सेक्स ड्राइव्ह किंवा कामेच्छा कमी झाल्याचं बघायला मिळालं. फोनमधील रेडीएशनमुळे महिलांची कामेच्छा २५ टक्के कमी होते.
इरेक्टाइल डिस्फंक्शन
एका दुसऱ्या रिसर्चमधून समोर आले आहे की, जे पुरूष ४ तासांपेक्षा जास्त स्मार्टफोन सोबत ठेवतात आणि त्याचा वापर करतात त्यांना इरेक्शनसंबंधी समस्या इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये नपुंसकतेची समस्या असलेल्या २० पुरूषांना आणि कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या नसलेल्या १० महिलांचाही समावेश करण्यात आला होता.