(Image Credit : theintimatecouple.com)
जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा प्रत्येकाची आवड-पसंती वेगवेगळी असते. कोणताही एका फॉर्मूला प्रत्येकांवर लागू पडत नाही. अनेक लोकांना थेट शारीरिक संबंधाआधी फोरप्ले करणं आवडतं तर काही लोकांना हे आवडत नाही. काही लोकांना कार्यक्रम लवकर संपवण्याची फारच घाई झालेली असते. यूकेतील एका सेक्स टॉय कंपनीने Sexual Happiness Study 2019 असा एक सर्व्हे केलाय. ज्याद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, महिलांना कोणत्या गोष्टी आवडत नाहीत.
क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात केवळ १० पैकी ७ महिला
या सर्व्हेदरम्यान कंपनीने यूके, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील ३ हजार लोकांना त्यांच्या सेक्शुअल लाइफसंबंधी काही प्रश्न विचारले. त्यानुसार सर्व्हेचे निष्कर्ष असे आहेत की, जिथे १० पैकी ९ पुरूषांना म्हणजे ९० टक्के पुरूषांना शारीरिक संबंधावेळी ऑर्गॅज्मचा अनुभव होतो. तेच महिलांसाठी शारीरिक संबंधावेळी ऑर्गॅज्मचा अनुभव मिळवण्याचा आकडा १० पैकी ७ आहे. म्हणजे ७० टक्के.
फोरप्ले न करणं
सर्व्हेत सहभागी साधारण ३० टक्के महिलांचं मत आहे की, सेक्शुअल अॅक्टआधी जर योग्य पद्धतीने जर फोरप्ले केला गेला नाही तर त्यांना फार निराशा वाटते. फोरप्लेमुळे शारीरिक संबंधात परमोच्च आनंद मिळण्यासाठी मदत होते. म्हणजे एकप्रकारे फोरप्ले करून शरीर संबंधासाठी तयार केलं जातं. त्यामुळे पुरूषांनी थेट मेन अॅक्ट न करता फोरप्ले करण्यालाही महत्व द्यावं. तेव्हा दोघांनाही यातून समान आनंद मिळू शकेल.
शरीराबाबत असहजता जाणवणे
असं होऊ शकतं की, बाळाच्या जन्मानंतर महिलांचा त्यांच्या शरीराबाबतचा आत्मविश्वास कमी झाला असेल. असंही होऊ शकतं की, पिरियड्समुळे त्यांना फार प्रेशर आल्यासारखं वाटत असेल. अशावेळी पुरूष जोडीदारीची ही जबाबदारी असते की, महिला जोडीदाराला शरीरावरून काही वाईट कमेंट करू नये, त्यांना असजहता वाटेल असं काही बोलू नका. असं झालं तर मोकळेपणाने दोघेही हवा तो आनंद मिळवू शकाल.
सेक्शुअल अनुभवांचा अहंकार
तुम्हाला शारीरिक संबंधाबाबत किती अनुभव आहे, तुम्ही याआधी कितीदा शारीरिक संबंध ठेवले आहेत आणि तुम्हाला याबाबत किती माहिती आहे. तुमच्या ज्ञानाचा महिला जोडीदारासमोर शो-ऑफ करू नका. पुन्हा पुन्हा तुमच्या सेक्शुअल अहंकाराला जोडीदारासमोर व्यक्त करणं महिलांना पसंत नसतं. असात तुम्ही जेवढे विनम्र बनून रहाल तेवढा तुमचा फायदा.
ऑर्गॅज्मबाबत पुन्हा पुन्हा विचारणं
शारीरिक संबंधादरम्यान महिलांना पुरूषांची ही गोष्ट अजिबात आवडत नाही. महिलांच्या ऑर्गॅज्मबाबत पुरूषांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते सुद्धा हे विचारतात की, क्लायमॅक्सपर्यंत पोहोचले की नाही. पण पुन्हा पुन्हा याबाबत विचारल्याने महिलांमध्ये निराशा येऊ शकते.
त्यांचं शरीर जास्त एक्सप्लोर करणं
अनेक पुरूष हे शारीरिक संबंधावेळी महिलांच्या शरीराला किंवा त्यांच्या अवयवांना असं ट्रिट करतात जणू ते त्यांच्यासमोर पडलेलं एखादं साहित्य आहे. जे त्यांना एक्सप्लोर करायचं आहे. अशाप्रकारचं वागणं महिलांना पसंत नसतं आणि याने त्यांचा मूड ऑफ होऊ शकतो.
पॉर्न क्लिपची रिअल लाइफमध्ये नक्कल करणे
अनेकजण पॉर्नला लैंगिक जीवनाची माहिती मिळवण्याचं महत्त्वाचं माध्यम मानतात. जे फारच चुकीचं आहे. त्यामुळे स्क्रीनवर जे दिसतं ते रिअल लाइफमध्ये करण्याचा प्रयत्न करणं तुमची मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनाची, तुमची आणि महिला जोडीदाराची तुलना पॉर्न स्टारसोबत करू नका.