शारीरिक संबंध हा शारीरिक जवळीकता निर्माण करणारा तर असतोच सोबतच भावनिक जवळीकताही यातून होते. सुरूवातीच्या स्टेजनंतर महिलांचं शरीर बदलत राहतं, पण अनेकदा शारीरिक संबंधादरम्यान इतक्या वेदना होतात की, त्यांच्यासाठी आनंद देणारा शारीरिक संबंध त्रासदायक ठरू लागतो. मात्र, अशात काही टिप्स कामी येऊ शकतात.
लुब्रिकंट
लुब्रिकंटचा वापर करण्यास अजिबात लाजू नका. तुमचं लाजणं किंवा असहज असणं तुमच्या प्रायव्हेट पार्टसाठी नुकसानकारक ठरू शकतं. लुब्रिकंटचा वापर करून पेनिस्ट्रेशनदरम्यान प्रायव्हेट पार्टला रिलॅक्स होण्याची संधी मिळते. याने वेदना आनंददायी ठरते. मात्र, लुब्रिकंटचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
कम्फर्ट
तुमचा पार्टनर शारीरिक संबंधासाठी उत्साही आहे आणि तुम्ही सहज नसाल तर तुम्हाला त्यांची एक्साइटमेंट जराही जाणवणार नाही. त्यामुळे तुमचं शरीर इंटरकोर्ससाठी तयार होणार नाही. अशात पेनिस्ट्रेशनदरम्यान जास्त वेदना होण्याची शक्यता असते. चांगलं होईल की, तुम्ही कम्फर्ट व्हावं आणि सेक्शुअल अॅक्टिविटीमध्ये सहभागी व्हावं.
रूमचं तापमान
कम्फर्ट असणं आणि एक्साइटमेंटचा संबंध रूमच्या तापमानाशीही असतो. जास्त गरम किंवा थंड तापमानात कम्फर्ट वाटणं कठिण आहे. जर शरीर सहज नसेल तर शारीरिक संबंधावेळी त्याला व्हजायनाला लुब्रिकेट करण्यास अडचण येईल, याने शारीरिक संबंध वेदनादायी होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधाआधी रूमचं तापमान नॉर्मल करून घ्याव.
फोरप्ले
फोरप्लेमुळे व्हजायनाला लुब्रिकेच व्हायला मदत मिळते. फोरप्ले केला गेला तर दोघांनाही जास्त वेळ आणि आनंद देणारा शरीरिक संबंध ठेवता येईल. दोघांनाही याने ऑर्गॅज्मचाही अनुभव मिळू शकतो.
पोजिशन
अनेकदा वेदनेचं कारण शारीरिक संबंधासाठी वापरली जाणारी पोजिशनही असतं. भलेही लैंगिक जीवन तुम्हाला स्पायसी करायचं असेल, पण जर तुम्ही जे करत आहात त्याने असह्य वेदना होत असतील किंवा तुमचा मूड निघून जात असेल तर त्यापेक्षा दुसरं काही ट्राय करा.