आजकाल लोक लैंगिक जीवन एक्सायटिंग करण्यासाठी वेगवेगळे एक्सपरिमेंट्स करत असतात. अनेकजण संबंध ठेवताना पार्टनरला कोणत्याही प्रकारच्या वेदना होऊ नये म्हणून लोक वेगवेगळ्या क्रीम, द्रव्य पदार्थांचा वापर करतात. काही वेळेला शारीरिक संबंधावेळी महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नैसर्गिक ओलावा नसतो. त्यामुळे यावेळी वेदना जास्त होतात आणि या वेदना टाळण्यासाठी ल्यूबचा वापर करत नाहीत. ल्यूबऐवजी लोक त्यांची लाळ, बॉडी लोशन, खोबऱ्याचं तेल, व्हॅसलीनसारख्या प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो.
शारीरिक संबंधावेळी या गोष्टींचा वापर करताना घाईघाईत लोक हे विसरून जातात की, यांचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. मेट्रो यूकेतील एका रिपोर्टनुसार, संबंध ठेवताना ओलावा रहावा यासाठी कपल्स वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. याने व्हजायनाची पीएच लेव्हल बिघडते. आज आपण जाणून घेऊ या वस्तूंच्या वापराचा वाईट प्रभाव कसा पडतो.
लाळ
रिपोर्टनुसार, काही कपल्स संबंध ठेवताना पार्टनरला वेदना होऊ नये म्हणून लाळेचा वापर करतात. पण असं केल्याने व्हजायनामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका होऊ शकतो. कारण लाळेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात.
पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेलीचा देखील अनेक कपल्स ल्यूब म्हणून वापर करतात. पेट्रोलियम जेलीचा वापर केल्याने व्हजायनाची पीएट लेव्हल बिघडते आणि याने खाज येण्याची समस्या होऊ शकते.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल हे गुणांचा खजिना मानलं जातं. याच कारणामुळे अनेक कपल्स याचा वापर संबंध ठेवताना करतात. पण काही लोकांसाठी हे चांगलं ठरू शकत नाही. याने व्हजायनामध्ये इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.
बॉडी लोशन
त्वचा मुलायम ठेवण्यासाठी हिवाळ्यात अनेकजण बॉडी लोशनचा वापर करतात. पण याचा वापर शारीरिक संबंधादरम्यान प्रायव्हेट पार्टवर केला तर परिणाम घातक ठरू शकतात. यातील केमिकल्समुळे व्हजायनाच्या संवेदनशील त्वचेचं नुकसान होऊ शकतं.