ऑर्गॅज्म हा शब्द अनेकदा वाचला आणि ऐकला जातो. काहींना या शब्दाचा अर्थ खरंच माहीत असतो तर काही लोक अर्थ समजल्याचा आव आणतात. शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अनेकांना ऑर्गॅज्मच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात. तर अनेकांना याबाबत काहीच माहिती नसते. या स्थितीमध्ये ब्लडचा फ्लो शरीराच्या इतर भागांमध्ये अधिक होतो आणि मांसपेशीमधील तणाव कमी होतो. ऑर्गॅज्मबाबतच्या अशाच आणखीही काही गोष्टी जाणून घेऊ.....
ऑर्गॅज्मचा अनुभव आला कसं कळतं?
ऑर्गॅज्म ही शारीरिक सुखाची एक भावना आहे. ज्यात संपूर्ण शरीरात एक कंपणाची जाणीव होते आणि जेव्हा याचा अनुभव होतो तेव्हा आपोआप तुम्हाला याची जाणीव होते. सेक्शुअली उत्तेजित करणारी अॅक्टिविटी आहे. तसेच इंटरकोर्सदरम्यान फीमेल सेक्स ऑर्गन व्हजायना प्रसरण पावतो, त्यातून लुब्रिकेशन होऊ लागतं आणि ब्रेस्टमध्येही सूज येऊ लागते. याचा अनुभव होत असताना किंवा झाला असताना श्वास भरून येतो तसेच ब्लड प्रेशर वाढतं. प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूच्या मांसपेशी आकुंचन पावतात. ऑर्गॅज्मही सेक्शुअल एक्साइटमेंटची चरम सीमा आहे. ज्यात सामान्यपणे व्हजायनातून डिस्चार्ज होतं. मात्र, सगळ्यांनाच डिस्चार्जचा अनुभव येईल असं नाही. काहींना त्याशिवायही ऑर्गॅज्मचा अनुभव येतो.
महिलांमध्ये ऑर्गॅज्म
अमेरिकेतील वयस्कांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, महिलांमध्ये तीन पुरुषांच्या बरोबरीत ऑर्गॅज्म होतं. प्रत्येक तीनपैकी एका महिलेला पार्टनरसोबत ऑर्गॅज्मची समस्या होते आणि ८० टक्के महिला केवळ शारीरिक संबंध ठेवून ऑर्गॅज्मचा अनुभव घेऊ शकत नाहीत. मात्र जास्तीत जास्त महिलांना हस्तमैथुनादरम्यान ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो.
पुरूषांमध्ये स्खलनाविनाही ऑर्गॅज्म
स्खलन आणि ऑर्गॅज्म या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. ऑर्गॅज्मची जाणीव मेंदूमध्ये होते आणि स्खलन ही शरीरातून वीर्य बाहेर येण्याची शारीरिक प्रक्रिया आहे.
प्रसुतीदरम्यान ऑर्गॅज्म
जर्नल ऑफ सेक्सॉलॉजी(अमेरिका) मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, काही महिलांना बाळाच्या जन्मावेळी सुद्धा ऑर्गॅज्म होतं. पण असा अनुभव येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे.
ऑर्गॅज्मनंतर मिळणारी संतुष्टी
ऑर्गॅज्मनंतर तुम्हाला आधीपेक्षा जास्त आनंद, संतुष्ट आणि ऊर्जेचा अनुभव मिळतो. कारण ऑर्गॅज्म नंतर आपल्या शरीरात एंडॉर्फिन आणि एक ब्रेन केमिकल रिलीज होतं. हे केमिकल पीईए नावानं ओळखलं जातं.
नियमित ऑर्गॅज्मने डिप्रेशन दूर होतं
नियमितपणे ऑर्गॅज्मचा अनुभव झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो. एक्सपर्टचं असं मत आहे की, याने व्यक्तीचं आयुष्य वाढतं. कारण याचा हृदय आणि इम्यून सिस्टीमवर चांगला प्रभाव पडतो.
ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड
सेंटर फॉर मॅरिटल अॅन्ड सेक्शुअल स्टडीज कॅलिफोर्नियामधील एका प्रयोगादरम्यान ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम झाला होता. १९९६ मध्ये एका महिलेने ४५ सेकंदात ऑर्गॅज्मचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
२० महिलांना किस द्वारे ऑर्गॅज्म
एका रिसर्चनुसार, १० टक्के महिलांना एक्सरसाइजदरम्यान, काही महिलांना ब्रेस्टला स्पर्श केल्यावर आणि २० टक्के महिलांना किस केल्यावर ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.